Delhi Govt vs LG :  दिल्लीत अरविंद केजरीवालच 'किंग'! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला दणका, नायब राज्यपालांचे अधिकार मर्यादितच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 01:26 PM2023-05-11T13:26:35+5:302023-05-11T13:27:02+5:30

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने नायब राज्यपालांचं अधिकारक्षेत्र घटलं

delhi govt vs lg supreme court verdict who controls national capital transfer cases Modi govt | Delhi Govt vs LG :  दिल्लीत अरविंद केजरीवालच 'किंग'! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला दणका, नायब राज्यपालांचे अधिकार मर्यादितच

Delhi Govt vs LG :  दिल्लीत अरविंद केजरीवालच 'किंग'! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला दणका, नायब राज्यपालांचे अधिकार मर्यादितच

googlenewsNext

Arvind Kejriwal vs LG, Delhi दिल्लीतील मुख्यमंत्री विरुद्ध नायब राज्यपाल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा निर्णय दिला. दिल्लीसरकारला अधिकार्‍यांची पदस्थापना आणि बदली करण्याचे अधिकार असावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. म्हणजेच उपराज्यपाल नव्हे तर मुख्यमंत्रीच दिल्लीचे खरे बॉस असतील, असा निकालाचा आशय दिसून आला. वास्तविक, केंद्र सरकारने 2021 मध्ये सरकार ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली ऍक्ट (GNCTD ऍक्ट) मध्ये सुधारणा केली होती. यामध्ये दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरला आणखी काही अधिकार देण्यात आले. या कायद्या विरोधात आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने लागला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील महत्त्वाच्या बाबी

- अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदलीचे अधिकार दिल्ली सरकारकडे असतील.
- निवडून आलेल्या सरकारला प्रशासकीय सेवेचा अधिकार असायला हवा. निवडून आलेल्या सरकारला व्यवस्था चालवण्याचे अधिकार नसतील तर तिहेरी साखळी ही जबाबदारी पार पाडली जाऊ शकत नाही.
- उपराज्यपालांना सरकारचा सल्ला मानावा लागेल.
- पोलिस, सार्वजनिक सुव्यवस्था आणि जमीन यांचे अधिकार केंद्राकडेच राहतील.

GNCTD कायदा म्हणजे काय? दुरुस्तीनंतर एलजीचे अधिकार वाढले

खरं तर, दिल्लीतील विधानसभा आणि सरकारच्या कामकाजासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली (GNCTD) कायदा, 1991 लागू आहे. 2021 मध्ये केंद्र सरकारने त्यात सुधारणा केली होती. या दुरुस्तीअंतर्गत दिल्लीतील सरकारच्या कामकाजाबाबत काही बदल करण्यात आले. यामध्ये लेफ्टनंट गव्हर्नरला काही अतिरिक्त अधिकार देण्यात आले होते. या दुरुस्तीनुसार निवडून आलेल्या सरकारला कोणत्याही निर्णयासाठी एलजीचे मत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कायद्यात असे म्हटले होते की, 'राज्याच्या विधानसभेने बनवलेल्या कोणत्याही कायद्यात सरकारचा अर्थ उपराज्यपाल असेल.' या वाक्यावर मुळात दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने आक्षेप घेतला होता. याला आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारच्या बाजूने निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

- सरन्यायाधीशांनी घटनात्मक खंडपीठाचा निकाल देताना दिल्ली सरकारच्या अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी केंद्राच्या युक्तिवादांना सामोरे जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. NCTD कायद्याच्या कलम 239aa मध्ये अधिकारांची विस्तृत श्रेणी परिभाषित केली आहे. 239aa विधानसभेच्या अधिकारांचे देखील योग्य स्पष्टीकरण देते. यामध्ये तीन विषय शासनाच्या अखत्यारीबाहेर ठेवण्यात आले आहेत.

- CJI म्हणाले, सर्व न्यायाधीशांच्या संमतीने हा बहुमताचा निर्णय आहे. ही केवळ सेवांवर नियंत्रण ठेवण्याची बाब आहे. अधिकाऱ्यांच्या सेवांवर कोणाचा अधिकार आहे? CJI म्हणाले, आमच्यासमोर मर्यादित मुद्दा हा आहे की दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील सेवांवर कोणाचे नियंत्रण असेल? 2018 चा निकाल या मुद्द्यावर स्पष्टता प्रदान करतो परंतु केंद्राने उपस्थित केलेल्या युक्तिवादांना सामोरे जाणे आवश्यक आहे. कलम 239AA सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते.

- CJI म्हणाले, NCT हे पूर्ण राज्य नाही. अशा स्थितीत राज्य पहिल्या यादीत येत नाही. एनसीटी दिल्लीचे अधिकार इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. प्रशासन हे GNCTD चे संपूर्ण प्रशासन समजू शकत नाही. अन्यथा निवडून आलेल्या सरकारची शक्ती कमकुवत होईल. एलजीकडे दिल्लीशी संबंधित सर्व मुद्द्यांवर सर्वसमावेशक प्रशासकीय अधिकार असू शकत नाहीत. "एलजीचे अधिकार त्यांना दिल्ली विधानसभेच्या आणि निवडून आलेल्या सरकारच्या विधायी अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार देत नाहीत."

Web Title: delhi govt vs lg supreme court verdict who controls national capital transfer cases Modi govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.