मंदिर तोडफोड करणाऱ्या जमावात 'आप'चा मंत्री; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 01:19 PM2019-07-04T13:19:14+5:302019-07-04T13:34:21+5:30
हौज काजीच्या चांदणी चौक येथे मंगळवारी गाडीच्या पार्किंगवरून दोन गटात तुफान राडा पहायला मिळाला होता.
नवी दिल्ली - हौज काजी येथील दोन गटात झालेल्या वादाच्या घटनेला आता नवीन वळण लागले आहेत. मंदिर तोडफोड प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री इमरान हुसैन यांचे नाव समोर येत आहे. तर मंदिरमध्ये घुसून तोडफोड करणाऱ्या जमावातील लोकं सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. यात आपचे मंत्री हुसैन स्पष्ट दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात हुसैन यांची आता पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे.
हौज काजीच्या चांदणी चौक येथे मंगळवारी गाडीच्या पार्किंगवरून दोन गटात तुफान राडा पहायला मिळाला होता. तर त्यानंतर याच परिसरातील एका मंदिरावर दगडफेक करण्याच्या आरोप भाजप नेते आणि राज्यसभा खासदार विजय गोयल यांनी केला होता. तसेच या सर्व प्रकरणामागे आपचे मंत्री इमरान हुसैन यांचा हात असल्याच्या आरोप सुद्धा गोयल यांनी केला आहे. विशेष म्हणजे तोडफोड करणाऱ्या जमावात हुसैन उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबतीत खात्री करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
दिल्लीच्या चांदणी चौकात झालेल्या वादानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते . खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी याची दखल घेत पोलीस आयुक्त यांच्यासोबत बैठक घेत सूचना केल्या होत्या. सद्या या परिसरात शांतता आहे. स्थ्यानिकांनी मंदिरात पूजा करून जातीय तडे निर्माण करणाऱ्यांच्या तोंडात चपराक दिली असल्याचे दिल्लीच्या पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक म्हणाले.