दिल्ली हायकोर्टाची केजरीवाल, आझाद यांना नोटीस

By admin | Published: January 16, 2016 01:06 AM2016-01-16T01:06:46+5:302016-01-16T01:06:46+5:30

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेवरील (डीडीसीए) आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी डीडीसीएकडून दाखल मानहानीच्या खटल्यावर सुनावणी

Delhi High Court notice to Kejriwal, Azad | दिल्ली हायकोर्टाची केजरीवाल, आझाद यांना नोटीस

दिल्ली हायकोर्टाची केजरीवाल, आझाद यांना नोटीस

Next

दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेवरील (डीडीसीए) आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी डीडीसीएकडून दाखल मानहानीच्या खटल्यावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजपाचे निलंबित खा. कीर्ती आझाद यांना नोटिसा बजावल्या आहे.
डीडीसीएकडून उच्च न्यायालयात दाखल मानहानीच्या याचिकेवर सुनावणी करताना सब रजिस्टार अनिल कुमार यांनी सदर याचिका सुनावणीयोग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दोन्ही प्रतिवादींना आपापले म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजावल्या असून दोघांनाही २ मार्चपर्यंत न्यायालयात आपली बाजू मांडावी लागेल. डीडीसीएची प्रतिमा
मलीन केल्याप्रकरणी केजरीवाल व आझाद यांच्यावर प्रत्येकी अडीच कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. डीडीसीएवर आर्थिक अनियमितता, ज्युनिअर खेळाडूंच्या निवडीत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे संघटनेची प्रतिमा मलीन झाली, अशी माहिती डीडीसीएचे वकील संग्राम पटनायक यांनी दिली.

Web Title: Delhi High Court notice to Kejriwal, Azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.