संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका; 'या' शहरात आढळले रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:13 PM2021-05-07T12:13:52+5:302021-05-07T12:17:42+5:30
Covid Induced Black Fungus Case : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता आणखी एका फंगसचा धोका निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहेय. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,14,91,598 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,34,083 वर पोहोचला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता आणखी एका फंगसचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीत ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत.
दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनामुळे "म्यूकोरमायसिस" प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. म्यूकोरमायसिस हे कोरोनामुळे होणारं एक फंगल संक्रमण आहे. यामध्ये डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मुंजाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला कोरोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आलं होतं. तसेच नाक आणी गळ्याचं हाड गळून गेलं होतं."
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/9sOMCDWJzX
— Lokmat (@MiLOKMAT) May 7, 2021
रुग्णालयातील ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी "मधुमेह असलेल्या कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे" असं सांगितलं. ब्लॅक फंगसची लक्षण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. खासकरून मधुमेह, किडनी, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांनी पीडित लोकांमध्ये ही समस्या अधिक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचे थैमान! गेल्या वर्षी 734 डॉक्टर्सचा मृत्यू; रुग्णांच्या संख्येने वाढवली चिंता#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/rlmurxo5Di
— Lokmat (@MiLOKMAT) May 6, 2021
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे रुग्ण, 2 कोटींचा टप्पा केला पार
देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. शुक्रवारी (7 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 4,14,188 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 3,915 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,14,91,598 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,34,083 वर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 36,45,164 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,76,12,351 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
CoronaVirus Live Updates : हाहाकार! "11 जूनपर्यंत तब्बल 4 लाख 4 हजार लोकांना कोरोनामुळे गमवावा लागू शकतो जीव"#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/MYeOf0y97Z
— Lokmat (@MiLOKMAT) May 6, 2021
CoronaVirus Live Updates : विद्यार्थ्यांनी तयार केलं अनोखं सॉफ्टवेअर; कोरोनाच्या संकटात होणार मदत#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/r7Y87HGc0B
— Lokmat (@MiLOKMAT) May 6, 2021