"IAS अधिकाऱ्याने पुजार्याला दिली आपली खुर्ची"; Video वरून वादात सापडताच म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 04:41 PM2023-10-24T16:41:22+5:302023-10-24T16:41:45+5:30
दिल्लीतील जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्त केलेले IAS अधिकारी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर वादात सापडले आहेत.
दिल्लीतील जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्त केलेले IAS अधिकारी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर वादात सापडले आहेत. व्हिडिओमध्ये तो एका पुजाऱ्याचा सन्मान करताना आणि त्याला त्यांच्या खुर्चीवर बसवताना दिसत आहे.
महसूल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीचे जिल्हा दंडाधिकारी आणि 2019 बॅचचे आयएएस अधिकारी लक्ष्य सिंघल यांनी आपली 'चूक' मान्य केली आहे, ते म्हणाले की ते फक्त त्यांच्या गुरूंना आदर देत होते आणि ते त्यांच्या अधिकृत जबाबदारीशी संबंधित नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, असा इशारा अधिकाऱ्याला देण्यात आला आहे.
IAS Lakshay Singhal
— @Aspirant_upsc7 (@Aspirant_upsc7) October 22, 2023
DM south west Delhi pic.twitter.com/NXBGDozLcJ
महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सिंघल यांना याबाबत विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं की, ते सुरुवातीपासून माझे गुरू आहेत. मी त्याला सन्मानासाठी आमंत्रित केले होते. त्यांनीच मला माझ्या महाविद्यालयीन जीवनात UPSC च्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला होता.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सिंघल यांनी असंही सांगितलं की हे केवळ सन्मान देण्यासाठी म्हणून केलं गेलं आणि त्यांच्या अधिकृत कामात कोणताही हस्तक्षेप नाही. भविष्यातही हे लक्षात ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सिंघल यांच्याकडून कोणतीही तत्काळ प्रतिक्रिया मिळू शकली नाही. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर दोन महिला ब्यूरोक्रेटमध्ये झालेल्या भांडणप्रकरणी कर्नाटक सरकारने कारवाई केली होती.