केंद्र सरकारच्या दबावामुळे दिल्ली IIT संचालकांचा राजीनामा ?

By admin | Published: December 28, 2014 01:08 PM2014-12-28T13:08:27+5:302014-12-28T15:29:16+5:30

आयआयटी दिल्लीचे संचालक डॉ. रघुनाथ शेवगांवकर यांनी शनिवारी रात्री संचालकपदाचा राजीनामा दिला असून केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या दबावाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते.

Delhi IIT directors resign due to pressure from the central government? | केंद्र सरकारच्या दबावामुळे दिल्ली IIT संचालकांचा राजीनामा ?

केंद्र सरकारच्या दबावामुळे दिल्ली IIT संचालकांचा राजीनामा ?

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २८ - आयआयटी दिल्लीचे संचालक डॉ. रघुनाथ शेवगांवकर यांनी शनिवारी रात्री संचालकपदाचा राजीनामा दिला असून केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या दबावाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. विशेष बाब म्हणजे या राजीनामा नाट्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव आल्याने खळबळ माजली आहे. 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिल्ली आयआयटीचे संचालक डॉ. रघुनाथ शेवगांवकर यांच्यावर दोन प्रमुख गोष्टींसाठी दबाव टाकला होता. यामध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला आयआयटीच्या मैदानात क्रिकेट अॅकेडमी सुरु करण्याची परवानगी देणे आणि सुब्रमण्यम स्वामी यांचे १९७२ ते १९९१ या कालावधीतील थकीत वेतन १८ टक्के व्याजाने देणे या दोन प्रस्तावांचा समावेश होता. मात्र शेवगांवकर यांनी या दोन्ही प्रस्तावांना मंजुरी देण्यासन नकार दिला होता. आयआयटीच्या कॅम्पसचा वापर संस्थेतील विद्यार्थी आणि कर्मचा-यांसाठीच व्हावा, संस्थेच्या मैदानाचा वापर व्यावसायिक वापरासाठी होऊ नये अशी शेवगांवकर यांची स्पष्ट भूमिका होते असे एका वृत्तपत्रात म्हटले आहे.
सुब्रमण्यम स्वामी हे १९७२ ते १९९१ या कालावधी दिल्ली आयआयटीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या कालावधीतील थकीत वेतन १८ टक्के व्याजाने देण्यात यावे अशी स्वामी यांची मागणी आहे. यानुसार ही रक्कम सुमारे ७० लाख रुपयांपर्यंत जाते. यापूर्वी युपीएच्या काळात केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने स्वामींच्या मागणी फेटाळून लावली होती. यानंतर स्वामी दिल्ली हायकोर्टातही गेले होते. मात्र केंद्रात मोदी सरकार येताच केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या भूमिकेत बदल झाला व खात्यातर्फे शेवगांवकर यांच्यावर या दोन्ही मागण्यांना मंजुरी देण्यासाठी दबाव वाढला होता. या दबावाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र मनुष्यबळ विकास खात्याने राजीनाम्याविषयी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, सचिन तेंडुलकरने ट्विटरद्वारे शेवगांवकर यांच्या राजीनाम्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे वृत्त निराधार असून दिल्ली आयआयटीमध्ये क्रिकेट अॅकेडमी सुरु करण्याचा कोणताही विचार नाही असे त्याने म्हटले आहे. 

Web Title: Delhi IIT directors resign due to pressure from the central government?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.