Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात? भाजप नेत्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 09:32 AM2022-04-17T09:32:22+5:302022-04-17T09:32:28+5:30

Jahangirpuri Violence: दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या वसाहतींना पाणी आणि विजेची जोडणी कशी मिळाली? भाजपचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना प्रश्न.

Delhi Jahangirpuri Violence News | Rohingya and Bangladeshis behind Jahangirpuri violence? BJP leaders accused | Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात? भाजप नेत्यांचा आरोप

Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात? भाजप नेत्यांचा आरोप

Next

Violence In Jahangirpuri: काल(16 एप्रिल) हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये (Delhi Jahangirpuri Violence) हिंसाचार झाल्याची घटना घडली. त्यात झालेल्या दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीदरम्यान नागरिकांसह अनेक पोलीसजखमी झाले.  आता त्या हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. 

मिरवणुकीवर दगडफेक हा 'दहशतवादी हल्ला'!
भाजप दिल्ली युनिटच्या नेत्यांनी हिंसाचाराला 'षडयंत्र' असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली आहे. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता आणि पक्षाचे खासदार मनोज तिवारी म्हणाले की, हा हल्ला अचानक घडलेला नसून पूर्वनियोजित कट होता. याशिवाय, पक्षाचे नेते कपिल मिश्रा यांनी मिरवणुकीवरील दगडफेकीला ‘दहशतवादी हल्ला’ म्हटले आहे. यावेळी त्यांनी अवैध स्थलांतरितांना देशातून तत्काळ हद्दपार करण्याची मागणी केली. आदेश गुप्ता म्हणाले की, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी करणार आहेत.

रोहिंग्यांना वीज जोडणी कशी मिळाली?
दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या वसाहतींना पाणी आणि विजेची जोडणी कशी दिली गेली, असा सवालही त्यांनी केला. "मला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारायचे आहे की ते शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींना पाणी आणि वीज का पुरवत आहेत?," असा सवाल त्यांनी एका व्हिडिओ संदेशात केला.

आपकडून प्रतिक्रिया नाही
आदेश गुप्ता यांच्या आरोपांवर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजप नेत्याने दिल्लीकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि पक्षाचे शिष्टमंडळ या भागाला भेट देणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले की, सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांची कागदपत्रे तपासली जावीत आणि त्यांना तत्काळ हटवावे. हनुमान जयंती मिरवणुकीवर झालेला हल्ला हा योगायोग नसून पुर्वनियोजित कट होता. 

Web Title: Delhi Jahangirpuri Violence News | Rohingya and Bangladeshis behind Jahangirpuri violence? BJP leaders accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.