Delhi Lockdown Extended : दिल्लीत कोरोनाची स्थिती गंभीर, लॉकडाऊनचा कालावधी वाढविला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 01:38 PM2021-04-25T13:38:11+5:302021-04-25T13:40:44+5:30

Delhi Lockdown Extended : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढील एक आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढविला आहे.

Delhi Lockdown Extended: The lockdown is being extended to next Monday till 5 am: Delhi CM Arvind Kejriwal | Delhi Lockdown Extended : दिल्लीत कोरोनाची स्थिती गंभीर, लॉकडाऊनचा कालावधी वाढविला 

Delhi Lockdown Extended : दिल्लीत कोरोनाची स्थिती गंभीर, लॉकडाऊनचा कालावधी वाढविला 

Next
ठळक मुद्देदिल्लीत कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सतत वाढत्या कोरोना संसर्गामुळे गेल्या २४ तासांच ३५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने (Delhi Government) दिल्लीतील लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता दिल्लीत एक आठवड्यापुरता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्यामुळे आता लॉकडाऊन एक आठवड्यासाठी म्हणजेच ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. (We had imposed a 6-day lockdown in Delhi. The lockdown is being extended to next Monday till 5 am: Delhi CM Arvind Kejriwal)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढविला आहे. यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत रुग्णांच्या संख्येत वाढ होता आहे. यामुळे दिल्लीतील लॉकडाऊन (Delhi Lockdown Extended) पुढील सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. अजूनही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन हे शेवटचे शस्त्र आहे.


ऑक्सिजनची कमतरता - अरविंद केजरीवाल
सध्याच्या परिस्थितीत दिल्लीत ऑक्सिजनची गरज ७०० टनची आहे. मात्र केंद्र सरकारकडून आम्हाला ४८० टन ऑक्सिजन देण्यात आले आहे. काल १० टन ऑक्सिजन केंद्र सरकारने दिले आहे, म्हणजे एकूण ४९० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, ऑक्सिजनचा पूर्णपणे पुरवठा केला जात नाही. दिल्लीला ३३० ते ३३५ टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, त्यामुळे दिल्लीत ऑक्सिजनची कमतरता जास्त आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

(Fact Check: ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध नसल्यास नेब्युलायझरचा वापर होऊ शकतो? जाणून घ्या सत्य...)

राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत ३५७ जणांचा मृत्यू
दिल्लीत कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सतत वाढत्या कोरोना संसर्गामुळे गेल्या २४ तासांच ३५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २४१०३ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या ९३०८० वर पोहोचली आहे. गेल्या शुक्रवारी ३४८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर २४३३१ नवीन रुग्णांचा कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी दिल्लीत कोरोना संसर्गाची २६१६९ नवीन प्रकरणे नोंदविली गेली. याशिवाय, ३०६ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत गेल्या १० दिवसांत कोरोनामुळे १७५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

(CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! गेल्या २४ तासांत ३,४९,६९१ नवे रुग्ण, २७६७ जणांचा मृत्यू )

Web Title: Delhi Lockdown Extended: The lockdown is being extended to next Monday till 5 am: Delhi CM Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.