पाण्याच्या टाकीवरील वीट माकडाने फेकली, एकाला लागली आणि जागीच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:14 PM2021-10-21T18:14:58+5:302021-10-21T18:15:38+5:30
वीट लागल्याने मोहम्मद कुर्बान गंभीर रूपाने जखमी होऊन जमिनीवर कोसळला. आजूबाजूला उपस्थित लोक त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
माकडाच्या कारनाम्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. झालं असं की, माकड घराच्या दुसऱ्या मजल्यावर होतं. तेथून त्याने खाली एक वीट फेकली, जी खालून जात असलेल्या एका व्यक्तीला लागली आणि त्याचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, ही घटना चार ऑक्टोबरला सेट्रल दिल्लीच्या नबी करीम भागात घडली. इथे इमारतीवरून माकडेने फेकलेल्या विटेमुळे ३० वर्षीय मोहम्मद कुर्बानचा जीव गेला. पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात बेजाबाबदारपणामुळे मृत्यू झाल्याची एफआयआर दाखल केली आहे.
रिपोर्टमध्ये देण्यात आलं की, वीट लागल्याने मोहम्मद कुर्बान गंभीर रूपाने जखमी होऊन जमिनीवर कोसळला. आजूबाजूला उपस्थित लोक त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
चौकशीतून पोलिसांना आढळलं की, वीट ज्या घराच्या छतावर फेकली गेली, ते घर ओमप्रकाश मिश्रा नावाच्या व्यक्तीचं आहे. ओम याने पोलिसांना सांगितलं की, त्याने पाण्याच्या टाकीवर दोन वीटा ठेवल्या होत्या. जेणेकरून माकडाने ते उघडू नये.
पोलिसांनी सांगितलं की, सोमवारी सायंकाळी माकडांच्या एका ग्रुपने दोन्ही वीटा काढून एक इमारतीखाली फेकली आणि दुसरी इमारतीवरच फेकली होती. पोलीस म्हणाले की, कुर्बान बॅग विकण्याचं काम करत होता. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो बॅगचं साहित्य खरेदी करण्यासाठी जात होता.