Delhi MCD Election: दिल्लीत एका मतासाठी खेळ झाला! भाजपाने स्थायी समितींसाठी आपचा नगरसेवक फोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:51 AM2023-02-24T10:51:26+5:302023-02-24T10:53:23+5:30

भाजपाला स्थायी समितीमध्ये आपल्या ३ उमेदवारांना जिंकवण्यासाठी एक मत हवे होते. भाजपाकडे १०४ मते होती, परंतू जिंकण्यासाठी १०५ मतांची गरज होती.

Delhi MCD Election: A game for one vote in Delhi! BJP broke aap corporator for standing committees election | Delhi MCD Election: दिल्लीत एका मतासाठी खेळ झाला! भाजपाने स्थायी समितींसाठी आपचा नगरसेवक फोडला

Delhi MCD Election: दिल्लीत एका मतासाठी खेळ झाला! भाजपाने स्थायी समितींसाठी आपचा नगरसेवक फोडला

googlenewsNext

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली महापालिकेच्या महापौरांसह स्थायी समितीच्या निवडणुका पहिल्याच दिवशी घेण्यात येणार होत्या. परंतू पहिल्या दिवशी दिवस रात्रा राडा-गोंधळ घातल्याने तीन दिवस झाले तरी स्थायी समितीचे सदस्य निवडता आलेले नाहीत. महापौर, उपमहापौर पद गेले तरी चालेल पण स्थायी समित्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाने या काळात आपमध्ये मोठा खेळ केला आहे. 

Video: दिल्ली महापालिकेत रात्रभर राडा! आप-भाजपा नगरसेवक भिडले, हाणामारी अजूनही सुरुच

भाजपाला स्थायी समितीमध्ये आपल्या ३ उमेदवारांना जिंकवण्यासाठी एक मत हवे होते. भाजपाकडे १०४ मते होती, परंतू जिंकण्यासाठी १०५ मतांची गरज होती. यामुळे भाजपाने आपचे नगरसेवक पवन सहरावत यांनाच फोडले आणि भाजपमध्ये सहभागी केले. या निवडणुकीत भाजपा आणि आपही आपापल्या परीने जोर लावत होते. बुधवारी पहिल्या दिवशी महापौरपदी शैली ओबेरॉय यांची विजय झाला होता. उपमहापौरही आपचाच निवडून आला होता. 

त्याच सायंकाळी सहा स्थायी समित्यांसाठी मतदान घेणार येणार होते. परंतू, भाजपाने एवढा गोंधळ घातला की रात्रभर महापालिकेत मोठा राडा सुरु होता. एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या, बिस्कीटांचे पुडे आदी फेकण्यात आले. भाजपाने तर महापौरांच्या बाजुला असलेली मतपेटीच पळवून नेली होती. यावर कहर म्हणून महिला नगरसेविकांनी एकमेकांना मारहाण केली होती. पुरुष नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली होती. हा गोंधळ गुरवारी सकाळपर्यंत सुरु होता. 

भाजपाला तीन उमेदवार जिंकवण्यासाठी प्रत्येकी ३५ असे १०५ मते लागणार आहेत. तर आपला चार उमेदवार जिंकवण्यासाठी १४० मते हवी आहेत. परंतू आपकडे १३४ मतेच होती. अशातच एकतर भाजपाचे सदस्य फोडणे किंवा काँग्रेसचे सदस्य आपल्या बाजुने घेणे हे दोन पर्याय आपकडे होते. परंतू, महापौर निवडीवेळी काँग्रेसच्या सात सदस्यांनी सभागृहाचा त्याग केला होता. यामुळे भाजपाला एका मतासाठी एकच नगरसेवक फोडणे सोपे गेले आहे. यावर आता मतदान होणार आहे. 

Web Title: Delhi MCD Election: A game for one vote in Delhi! BJP broke aap corporator for standing committees election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.