दिल्ली मेट्रो १२ सप्टेंबरपर्यंत पूर्ववत होणार; सोमवारपासून आता दोन टप्प्यांत प्रवाशांना मिळणार सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 12:50 AM2020-09-06T00:50:15+5:302020-09-06T07:17:12+5:30
नवी दिल्ली : दिल्लीचे वाहतूकमंत्री कैलाश गहलोत यांनी दिल्ली मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन आणि ...
नवी दिल्ली : दिल्लीचे वाहतूकमंत्री कैलाश गहलोत यांनी दिल्ली मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी बैठक घेतली.
मेट्रो रेल्वेच्या वेगवेगळ्या लाइन्स ७ सप्टेंबरपासून सुरू होतील व १२ सप्टेंबरपर्यंत सगळ्या लाइन्स पूर्वीप्रमाणे संचालित होतील. मेट्रो प्रवासाठी सध्या टोकन वापरले जाणार नाही. स्मार्ट कार्ड, कॅशलेस रिचार्ज आणि आरोग्य सेतू अॅपच्या वापराला प्रोत्साहन आहे. स्टेशन्सवर एन्ट्री पॉइंटची संख्या कमी करून एक वा दोनच केली आहे. मेट्रो स्टेशन्सवर फिडर बस सेवा बंद असेल. कंटेन्मेंट झोनमधील सगळी स्टेशन्स बंद राहतील.
थर्मल स्क्रीनिंगनंतर फक्त निरोगी व्यक्तींनाच प्रवासाची परवानगी असेल. मास्कचा वापर अनिवार्य असेल तथा सॅनिटायझर प्रवाशांच्या उपयोगासाठी प्रत्येक प्रवेश पॉइंटवर उपलब्ध असेल.
च्टप्पा १ : मेट्रो स्टेशन्सचे कामकाज सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालेल.
टप्पा क : ७ सप्टेंबरपासून मेट्रो संचालन सुरू होईल आणि रॅपिड मेट्रो गुरगावसह लाईन २ ला या टप्प्यात सुरू केले जाईल.
टप्पा २ : लाईन ३, ४ आणि ७ वर ९ सप्टेंबरपासून मेट्रो सुरू होईल.
टप्पा ३ : मेट्रोची १, ५ आणि ६ लाईन १० सप्टेंबर रोजी सुरू होईल.
११ सप्टेंबर रोजी दुसरा टप्पा सुरू होईल.
टप्पा क : मेट्रो सेवा सकाळी ७ वाजेपासून दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ४ वाजेपासून सायंकाळी १० वाजेपर्यंत असेल. यात मेट्रोच्या ८ आणि ९ लाईनही सुरू केल्या जातील.१२ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत पूर्वीसारख्याच धावतील.