दिल्ली मेट्रोत चोरीच्या घटना वाढल्या

By Admin | Published: December 9, 2015 04:22 PM2015-12-09T16:22:35+5:302015-12-09T16:22:35+5:30

दिल्लीतील मेट्रोमध्ये चोरीच्या घटना वाढल्या असल्याची माहिती गृह राज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.

Delhi metro stolen incidents | दिल्ली मेट्रोत चोरीच्या घटना वाढल्या

दिल्ली मेट्रोत चोरीच्या घटना वाढल्या

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - दिल्लीतील मेट्रोमध्ये चोरीच्या घटना वाढल्या असल्याची माहिती गृह राज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.
गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यंदा दिल्ली मेट्रोमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच, काही घटनांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मेट्रोत २०१२ मध्ये  २४७ चोरीच्या घटना झाल्याची नोंद होती, तर यंदा ३० नोव्हेंबरपर्यंत जवळजवळ २,७४५ चोरीच्या घटना घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्यापैकी १३१ घटानांचा अद्याप पोलीस तपास करत असल्याचे हरीभाई चौधरी सांगितले. त्याचबरोबर फरिदाबाद पोलीस स्टेशन, गौतम बुद्ध नगर पोलीस स्टेशन आणि गाझियाबाद पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तीन वर्षात एकही चोरीची घटना घडली नसल्याचे नोंद करण्यात आले आहे, अशी माहिती  गृह राज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी राज्यसभेत दिली.  
 

Web Title: Delhi metro stolen incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.