दिल्ली मेट्रो 7 सप्टेंबरपासून सुरू होणार, उपराज्यपालांची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 04:14 PM2020-09-02T16:14:32+5:302020-09-02T16:14:46+5:30

कंटेन्मेंट झोनसह वेगवेगळ्या मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

The Delhi Metro will start from September 7, with the approval of the lieutenant governor | दिल्ली मेट्रो 7 सप्टेंबरपासून सुरू होणार, उपराज्यपालांची मान्यता

दिल्ली मेट्रो 7 सप्टेंबरपासून सुरू होणार, उपराज्यपालांची मान्यता

Next

दिल्लीत आयोजित दिल्ली आपत्ती व्यवस्थापन बैठकीत उपराज्यपाल अनिल बैजल यांनी राजधानीत मेट्रो चालविण्यास परवानगी दिली आहे. यासह 7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रो पुन्हा सुरू होईल. याबद्दल सविस्तर माहिती येणे बाकी आहे.
मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता
मेट्रो स्टेशन 7 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणात होणारी वाढ लक्षात घेता, मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या धर्तीवर सुरू केली जाऊ शकते. जेव्हा मेट्रो सेवा सुरू होईल तेव्हा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातील. असे असूनही मेट्रो सर्व मार्गावर धावल्यास प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येऊ शकतात. कंटेन्मेंट झोनसह वेगवेगळ्या मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
विमानतळ एक्स्प्रेस लाइनसह दिल्ली मेट्रोच्या एकूण 10 लाइन आहेत. सर्व मार्गांवरील प्रवाशांची संख्या, संसर्गाची स्थिती आणि इतर बाबींवर मंथन केले जात आहे. अलीकडेच दिल्लीच्या परिवहन मंत्र्यांनी मेट्रो स्थानकांची यादी तयार करण्यास सांगितले होते, तेथे प्रवासी सेवा पुरविल्या जाणार आहेत. सध्या विमानतळ मार्गावरील प्रवाशांची संख्या कमी असल्याने वारंवार बदल देखील करता येतील.
मेट्रोसाठी स्थानकाभोवती तयारी सुरू
मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी स्थानकांच्या आसपास दुरुस्ती व साफसफाईचे काम केले जात आहे. सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रवाशांच्या सुविधांची दुरुस्ती केली जात आहे. 

Web Title: The Delhi Metro will start from September 7, with the approval of the lieutenant governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो