दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी फेटाळला जामीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 12:58 PM2022-06-18T12:58:45+5:302022-06-18T13:00:06+5:30

Satyendra Jain : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सत्येंद्र जैन आणि त्याच्या साथीदारांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

delhi minister satyendra jain bail plea rejected in money laundering case | दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी फेटाळला जामीन 

दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी फेटाळला जामीन 

Next

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतीलआप सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Delhi Health Minister Satyendra Jain) यांना जामीन मिळालेला नाही. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सत्येंद्र जैन आणि त्याच्या साथीदारांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

सत्येंद्र जैन सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. छाप्यांमध्ये प्रकाश ज्वेलर्सकडे 2.23 कोटी रोख सापडल्याचा दावा ईडीने केला आहे, तर अन्य सहकारी वैभव जैन यांच्याकडे 41.5 लाख रोख आणि 133 सोन्याची नाणी सापडली आहेत. तर जीएस मथारू यांच्याकडे 20 लाखांची रोकड सापडली आहे.


ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच, एकूण  2.85 कोटी रुपये रोख आणि 133 सोन्याची नाणी सापडली आहेत, ज्याचे वजन जवळपास 1.80 किलो  आहे. ज्यांच्या स्रोताबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दिल्ली न्यायालयाने मंगळवारी सत्येंद्र जैन यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी ईडी आणि सत्येंद्र जैन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. ईडीने सत्येंद्र जैन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांखाली ताब्यात घेतले होते.

Web Title: delhi minister satyendra jain bail plea rejected in money laundering case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.