लाँग जर्नी But व्हेरी इजी; दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आज हाेणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 07:08 AM2023-02-12T07:08:21+5:302023-02-12T07:09:52+5:30
दिल्लीहून दौसाला जाण्यासाठी सहा तास लागतात, आता या महामार्गाच्या निर्मितीमुळे तुम्ही दिल्लीहून दौसाला अवघ्या अडीच तासांत पोहोचू शकता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. १२) दिल्ली- बडाेदा- मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. गुरुग्राम जिल्ह्यातील अलीपूर गावापासून राजस्थानातील दौसापर्यंत २२० किलोमीटरचा महामार्ग बांधून तयार झाला आहे. उद्घाटनासाठी मोदी येणार आहेत. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी गुरुग्राममधील अलीपूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होतील.
दिल्लीहून दौसाला जाण्यासाठी सहा तास लागतात, आता या महामार्गाच्या निर्मितीमुळे तुम्ही दिल्लीहून दौसाला अवघ्या अडीच तासांत पोहोचू शकता. दिल्लीहून जयपूरला दाेन तासांत पोहोचता येते. या महामार्गामुळे दिल्ली-जयपूर महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. दिल्ली ते मुंबई अवघ्या १२ तासांत हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हा प्रवास अवघ्या १२ तासांचा होणार आहे. सध्या याच प्रवासाला २४ तास लागतात.
#दिल्ली_मुंबई_एक्सप्रेस_वे पर ऑप्टिकल फाइबर केबल, पाइपलाईन, सौर ऊर्जा एवं वाटर हार्वेस्टिंग के लिए विशेष प्रावधान !#BuildingTheNation#Delhi_Mumbai_Express_Way#PragatiKaHighway #GatiShaktipic.twitter.com/UNTcgk9G0E
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 12, 2023