दिल्लीत अग्नितांडव, २७ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून नुकसान भरपाईची घोषणा, मालक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 08:05 AM2022-05-14T08:05:59+5:302022-05-14T10:45:13+5:30

या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय होतं.

Delhi Mundka Fire Morning visuals from the spot where a massive fire broke out in a building 13 May 27 people died and 12 got injured in the fire incident, | दिल्लीत अग्नितांडव, २७ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून नुकसान भरपाईची घोषणा, मालक अटकेत

दिल्लीत अग्नितांडव, २७ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून नुकसान भरपाईची घोषणा, मालक अटकेत

Next

दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील चार मजली व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला, १२ जण जखमी झाले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय होतं. हळूहळू आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरही पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३० हून अधिक गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या इमारतीला अग्निशमन विभागाची एनओसीदेखील नव्हती, अशी माहिती आता समोर येत आहे.

या इमारतीत पहिल्या मजल्यावर मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं, तर दुसऱ्या मजल्यावर वेअर हाऊस आणि तिसऱ्या मजल्यावर लॅब होती. दरम्यान, दुसऱ्याच मजल्यावर सर्वाधिक जीवितहानी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी दुसऱ्या मजल्यावर मोटिवेशनल स्पीच सुरू होती. या कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी अनेक कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय छतावर एक छोटा फ्लॅटही तयार करण्यात आला होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे मालक हरीश गोयल आणि वरूण गोयल यांना अटक करण्यात आली आहे. परंतु त्या घराचा मालक अद्याप फरार आहे. मनिष लाकरा असं त्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात निरनिराळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० पेक्षा अधिक बंब घटनास्थळी
यामध्ये अग्निशमन दलाच्या कोणत्याही जवानाला इजा झाली नाही. सकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी तैनात होत्या, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिली. दरम्यान, ५० पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं, तर २७ लोकांची मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, रात्री ११ वाजता या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आल्याचंही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं.


नुकसान भरपाईची घोषणा
"दिल्लीत लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. मी संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास-पन्नास हजार रुपयांची मदत दिली जाईल,” अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Web Title: Delhi Mundka Fire Morning visuals from the spot where a massive fire broke out in a building 13 May 27 people died and 12 got injured in the fire incident,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.