धक्कादायक! भरधाव कारने पोलिस बॅरिकेड तोडत कॉन्स्टेबलला उडवले, VIDEO व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 04:32 PM2023-10-27T16:32:19+5:302023-10-27T16:33:09+5:30

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

delhi-ncr-connaught-place-suv-car-breaking-police-barricade-hit-constable-video-viral | धक्कादायक! भरधाव कारने पोलिस बॅरिकेड तोडत कॉन्स्टेबलला उडवले, VIDEO व्हायरल...

धक्कादायक! भरधाव कारने पोलिस बॅरिकेड तोडत कॉन्स्टेबलला उडवले, VIDEO व्हायरल...


नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतअपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर उभा असलेल्या एका कॉन्स्टेबलला कार स्वाराने जोरदार धडक दिली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये 24-25 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही घटना घडली. व्हिडीओमध्ये रस्त्यावर बॅरिकेड लावल्याचे दिसत आहे. यावेळी एक कॉन्स्टेबल एका कार चालकाची चौकशी करत होता. तेवढ्यात पाठीमागून एक एसयूव्ही येते आणि त्या कॉन्स्टेबलला जोरदार धडक देते. या घटनेत तो कॉन्स्टेबल बॅरिकेडसह हवेत उडून रस्त्यावर पडतो. 

सुदैवाने या अपघातात त्या कॉन्स्टेबलचा जीव वाचला, पण तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपी कारचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे. कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता की, कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला, याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. 

Web Title: delhi-ncr-connaught-place-suv-car-breaking-police-barricade-hit-constable-video-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.