Atishi Marlena : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 04:06 PM2024-09-17T16:06:13+5:302024-09-17T16:12:20+5:30

Atishi Marlena : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आतिशी महिलांबाबत सर्वात मोठा निर्णय घेणार आहेत. आ

delhi new cm Atishi Marlena elect to take big decision for women after taking oath | Atishi Marlena : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे

Atishi Marlena : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आतिशी महिलांबाबत सर्वात मोठा निर्णय घेणार आहेत. आतिशी महिलांना आर्थिक सहाय्य देण्याशी संबंधित एक योजना राबवणार आहेत, ज्या अंतर्गत १८ वर्षांवरील महिलांना दरमहा १००० रुपये देण्याची तरतूद आहे. २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विधानसभेचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणार आहेत. 

अर्थसहाय्याची योजना अर्थसंकल्पात मंजूर झाली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असून विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. अरविंद केजरीवाल जेलमध्ये असल्याने ही योजना रखडली होती. त्याचबरोबर आता या योजनेच्या घोषणासह अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

अलीकडच्या काळात ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, तेथे अशा घोषणा करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. झारखंड आणि महाराष्ट्रात अशी घोषणा करण्यात आली आहे. अशीच घोषणा आता दिल्लीत होणार आहे जिथे पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार आहेत.

आम आदमी पक्ष पूर्णपणे निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. यासाठी एक रॅली प्रस्तावित आहे जी या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्यात होईल. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल पक्षाच्या स्वयंसेवकांना संबोधित करतील आणि त्यांना सांगतील की त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला आणि आतिशी यांना का निवडलं.

दिल्लीत केव्हाही निवडणूक होऊ शकते, असं आपने गृहीत धरलं आहे. अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्याने रखडलेली कामे पूर्ण करणं हेच विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यामागचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे. महिलांसाठी आर्थिक मदतीची घोषणा हे त्यापैकीच एक काम असल्याचं सांगितलं जात आहे.
 

Web Title: delhi new cm Atishi Marlena elect to take big decision for women after taking oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.