धक्कादायक! चोरी करायला आला अन् बोअरवेलमध्येच पडला, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 11:52 AM2024-03-10T11:52:39+5:302024-03-10T11:54:24+5:30

दिल्लीतील केशोपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक चोर चोरी करण्यासाठी मध्यरात्री एका कॉलनीत एका गेला होता. यावेळी  मंडीजवळ असणाऱ्या एका बंगल्याजवळ एक तरुण ४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला.

delhi news Came to steal and fell into the borewell, rescue operation underway | धक्कादायक! चोरी करायला आला अन् बोअरवेलमध्येच पडला, बचावकार्य सुरू

धक्कादायक! चोरी करायला आला अन् बोअरवेलमध्येच पडला, बचावकार्य सुरू

दिल्लीतील केशोपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक चोर चोरी करण्यासाठी मध्यरात्री एका कॉलनीत एका गेला होता. यावेळी  मंडीजवळ असणाऱ्या एका बंगल्याजवळ एक तरुण ४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. बोअरमधून वाचवण्यासाठी आवाजल येऊ लागला यामुळे अनेकांना वाटले लहान मुलगा पडला असेल पण नंतर बोअरवेलमध्ये पडलेला तो मुलगा नसून २० वर्षांचा तरुण असल्याचे समोर आले आहे. प्रकरण जल बोर्ड प्लांटचे आहे. हा तरुण चोर असल्याचे पाणी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तो चोरीच्या उद्देशाने येथे आला होता. मात्र रात्र असल्याने तो बोअरवेलमध्ये पडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रात्री १.१५ वाजता पोलिसांना आलेल्या कॉलनुसार, जल बोर्ड कर्मचाऱ्यांनी सांगितले की कोणीतरी त्यांच्या कार्यालयात चोरी करण्यासाठी आला होता आणि बोअरवेलमध्ये पडला. तरुणाची ओळख पटलेली नाही. 

८ तासांच्या छापेमारीनंतर ईडीने लालू प्रसाद यांच्या निकटवर्तीयाला केली अटक; २ कोटींची रोकड जप्त

तरुण बोअरवेलमध्ये पडताच एकच गोंधळ उडाला. याबाबत रात्री उशिरा पोलीस, एनडीआरएफ आणि अग्निशमन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली. पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.

एनडीआरएफ टीमने दिलेल्या माहितीनुसार,  बोअरवेलला समांतर आणखी एक बोअरवेल खोदण्याची तयारी सुरू आहे. बोअरवेलची खोली ४० फूट असून तरुणाला यातून बाहेर पडणे फार कठीण आहे. नवीन बोअरवेल खोदण्यासाठी NDRF टीमला बराच वेळ लागू शकतो. बोअरवेलजवळ जेसीबीने सुमारे ५० फूट खोदकाम करण्यात येणार आहे. त्यानंतर पाईप कापून तरुणाला बोअरवेलमधून बाहेर काढले जाईल.

दुसरीकडे, बोअरवेलमधून तरुणाला वाचवल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. तरुणाला बाहेर काढण्यासाठी दोरीही लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या मदतीने तरुणाला बाहेर काढले जाईल, असे आधी वाटले होते. पण प्रयत्न फसला. बोअरवेलच्या आत खूप अंधार आहे. टॉर्चच्या माध्यमातून तरुणाला पाहण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या तरुणाशी बोलण्याचाही सातत्याने प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून त्याला अस्वस्थ वाटू नये. या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे.

Web Title: delhi news Came to steal and fell into the borewell, rescue operation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.