ढिंच्यॅक पुजाविरोधात दिल्ली पोलीस करणार कारवाई
By admin | Published: June 29, 2017 12:08 PM2017-06-29T12:08:43+5:302017-06-29T12:09:34+5:30
ढिंच्यॅक पुजाची गाणी ऐकून तिच्यावर कारवाई करा अशी खिल्ली सोशल मीडियावर उडवली जात असते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - "सेल्फी मैने ले ली आज" म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ढिंच्यॅक पूजा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ढिंच्यॅक पुजाचा ‘दिलोंका शूटर है मेरा स्कूटर’ हा नवा व्हिडीओ रिलीज झाला आहे. ढिंच्यॅक पुजाची गाणी ऐकून तिच्यावर कारवाई करा अशी खिल्ली सोशल मीडियावर उडवली जात असते. विशेष म्हणजे आता दिल्ली पोलीस तिच्यावर खरोखरच कारवाई करणार आहे. पण दिल्ली पोलिस करत असलेली कारवाई तिच्या गाण्यामुळे नसून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने करणार आहे.
पुजाने ‘दिलोंका शूटर है मेरा स्कूटर’ गाण्याचा व्हिडीओ रिलीज केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्कूटर चालवत असून तिने हेल्मेट घातलेलं नाही. यावर आक्षेप घेत मोहित सिंह नावाच्या व्यक्तीने दिल्ली पोलिसांनी ट्विट करत तक्रार केली.
"तुमच्या माहितीसाठी ही मुलगी विना हेल्मेट स्कूटर चालवत असून, जोरजोरात गाणीदेखील गात आहे", असं ट्विट मोहित सिंहने केलं होतं. ट्विटमध्ये त्याने ढिंच्यॅक पुजाचा स्कूटरवरील फोटोही अपलोड केला होता.
@dtptraffic@DelhiPolice आपके संदर्भ में ये मोहतरमा बिना हेलमेट स्कूटर चला रही है और ख़ूब शोर करके गाने गा रही है । pic.twitter.com/osz56KsSpM
— Mohit singh (@mohit_news24) June 27, 2017
दिल्ली पोलिसांनीही मोहित सिंहच्या ट्विटची तात्काळ दखल घेतली. या घटनेची तारीख, वेळ आणि जागा सांगा, आम्ही योग्य ती कारवाई करु, असा रिप्लाय पोलिसांनी दिला. यानंतर मोहित सिंहने ’24 जून 2017 रोजी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सुरजमल विहार भागात हा प्रकार घडला’ अशी माहिती कळवली.
Thanks,kindly tweet with date,time and exact place so that necessary action can be taken.
— Delhi Traffic Police (@dtptraffic) June 27, 2017
जहग सूरजमल विहार समय दिन के 3 बजके दस मिनेट दिन 24 जून 2017 धन्यवाद
— Mohit singh (@mohit_news24) June 27, 2017
दिल्ली पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पहायला लागेल. मात्र ढिंच्यॅक पुजाविरोधात कारवाई होत असल्याने सोशल मीडियाला एक नवीन विषय मिळाला असून ट्रोलिंगला सुरुवात झाली आहे.
Thanks,action will be taken.
— Delhi Traffic Police (@dtptraffic) June 27, 2017