दिल्लीत 11 राज्यांचे ATS प्रमुख, RAW-IB च्या अधिकाऱ्यांची होणार बैठक; दहशतवाद आणि तालिबानवर चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 08:47 AM2021-09-17T08:47:08+5:302021-09-17T08:48:20+5:30

delhi police call meeting of all intelligence agencies and anti terror squad heads : एटीएस प्रमुख, एसओजी आणि 11 राज्यांच्या गुप्तचर संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

delhi police call meeting of all intelligence agencies and anti terror squad heads | दिल्लीत 11 राज्यांचे ATS प्रमुख, RAW-IB च्या अधिकाऱ्यांची होणार बैठक; दहशतवाद आणि तालिबानवर चर्चा  

दिल्लीत 11 राज्यांचे ATS प्रमुख, RAW-IB च्या अधिकाऱ्यांची होणार बैठक; दहशतवाद आणि तालिबानवर चर्चा  

googlenewsNext

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबाने कब्जा केल्यानंतर बिघडलेल्या परिस्थितीदरम्यान भारतातील सर्व गुप्तचर संस्था आणि सर्व राज्यांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखांची आंतर-समन्वय बैठक शुक्रवारी राजधानी दिल्लीत बोलावण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता बैठक सुरू होईल. एटीएस प्रमुख, एसओजी आणि 11 राज्यांच्या गुप्तचर संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे उद्दिष्ट एटीएससोबत गुप्तचर संस्थांचे अधिक चांगले समन्वय आणि येत्या काळात लवकरात लवकर गुप्तचर माहिती शेअर करणे असेल, असे सांगण्यात येते.

एटीएस व्यतिरिक्त रॉ, आयबी, एनआयएचे अधिकारी आणि फील्ड ऑपरेशनशी संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा केली जाईल. यासोबतच भारतातील दहशतवादी कारवायांवर कोणते बदल घडतील, यावरही चर्चा केली जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमुळे कोणत्याही उत्तम समन्वय आणि इतर घटनांसाठी आधी तयारी करण्यास मदत होईल. पहिल्यांदाच रॉ, आयबी, मिलिटरी इंटेलिजन्स एजन्सी आणि इतर एजन्सीजना दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयात बोलावले गेले आहे, असे सांगितले जात आहे. दरम्यान,   काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांना सीमा भागात घुसखोरीची माहिती मिळाली. गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला होता की, दहशतवादी देशात काहीतरी मोठे करण्याचा कट रचत आहेत.

दिल्ली पोलिसांकडून ६ दहशतवाद्यांना अटक
दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी नुकताच उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ६ दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एक मुंबईच्या सायन परिसरातील धारावीचा रहिवासी आहे. जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं या धारावीतील संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. या सर्वांची दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून कसून तपास सुरू आहे आणि यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूल उधळून लावल्यानंतर आता आणखी नवीन खुलासे होत आहेत. 

दिल्ली पोलीस स्पेशल सेलच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना रेल्वे लाईन आणि ब्रिज उडवण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते. याचसह गर्दीची ठिकाणंही त्यांच्या टार्गेटवर होती. या प्रकरणात आता स्लीपर सेलची भूमिकाही समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे दहशतवादी पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी गेले होते, परंतु त्यांच्या पासपोर्टवर तसा कोणताच स्टॅम्प नाही. त्यांनी समुद्री मार्गाचा पर्याय निवडला होता. ओमानहून पाकिस्तानाता जातावेळी त्यांनी मध्येच बोटही बदलली होती. हे दहशतवादी १९९३च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टसारखीच योजना आखण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांची रेकी केल्यानंतर एकत्र यायचे होते.  

Read in English

Web Title: delhi police call meeting of all intelligence agencies and anti terror squad heads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.