सलाम! 'या' महिला पोलिसाने ४२ दिवसात २१ बेपत्ता मुलांचा घेतला शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:01 PM2022-12-30T17:01:01+5:302022-12-30T17:02:19+5:30

दिल्ली पोलीस मधीलमेट्रो युनिटच्या महिला पोलीस हेड कॉनस्टेबल  सीमा  सध्या चर्चेत आल्या आहेत. मागच्या ४२ दिवसात त्यांनी मोठी कामगीरी केली आहे.

delhi police head constable seema traced 21 kids in 42 days | सलाम! 'या' महिला पोलिसाने ४२ दिवसात २१ बेपत्ता मुलांचा घेतला शोध

सलाम! 'या' महिला पोलिसाने ४२ दिवसात २१ बेपत्ता मुलांचा घेतला शोध

Next

दिल्ली पोलीस मधीलमेट्रो युनिटच्या महिला पोलीस हेड कॉनस्टेबल  सीमा  सध्या चर्चेत आल्या आहेत. मागच्या ४२ दिवसात त्यांनी मोठी कामगीरी केली आहे. तब्बल २१ बेपत्ता मुलांचा शोध या हेड कॉनस्टेबल यांनी लावला आहे. यातील काही मुल अनेक महिन्यांपासून बेपत्ता होते, तर काही मुल काही दिवसापूर्वी बेपत्ता झाले होते. या कामगिरीमुळे सध्या अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे. 

गेल्या दीड महिन्यात सीमा यांचा सर्वाधिक वेळ यूपी आणि हरियाणामध्ये छापे टाकण्यात गेला. यादरम्यान तिने हरवलेल्या मुलांसाठी ZIPNET ही वेबसाइट सुरू केली आणि हरवलेल्या मुलांचा शोध सुरू केला.

Rishabh Pant Accident: सचिन-वीरू ते आफ्रिदी; Rishabh Pant साठी भारत-पाकच्या खेळाडूंनी केल्या प्रार्थना

दिल्लीच्या जनकपुरी मेट्रो स्टेशनवर तैनात असलेल्या सीमा यांनी बेपत्ता झालेल्या मुलांना शोधण्यासाठी मेहनत घेतली. प्लॅनिंग करत शोध घेतला. मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या किंवा अशा गुन्हेगारांच्या कामाचा ती खूप अभ्यास करत असे. नंतर माहिती गोळा करणे, हालचालींचा मागोवा घेणे आणि सुगावाच्या आधारे पुढे जाणे असे काम करायची, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

सीमा यांनी पहिल्यांदा मुलांची घरे आणि लोकल बस, रेल्वे आणि मेट्रो स्टेशनवर चौकशी केली. सीमा या दिल्ली आणि इतर राज्यांतील मुलांचा शोध घेतला आणि त्यांना संबंधित पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांकडे सोपवते. बेपत्ता मुलांच्या शोधासाठी तयार करण्यात आलेल्या पोलीस पथकालाही माहिती दिली जाते आणि पडताळणीनंतर मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले जाते.

या 21 पैकी 4 केसेस अशा आहेत ज्यात त्यांना क्लू मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. असेच एक प्रकरण डबरी येथील बेपत्ता मुलीचे आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून ती बेपत्ता होती. तिला एका तरुणाने फूस लावली. त्यानंतर 9 महिने दोघांचाही पत्ता लागला नाही. काही तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर सीमाने डझनभर दुकानदारांची विचारपूस केली आणि शेवटी शिव विहारमधील एका घरातून मुलीला शोधून तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.

Web Title: delhi police head constable seema traced 21 kids in 42 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.