गाझीपूर बॉर्डरवर खिळे काढतानाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? पोलिसांनी सांगितलं...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 4, 2021 02:00 PM2021-02-04T14:00:47+5:302021-02-04T14:02:17+5:30

हे खिळे काढतानाचा एक व्हिडो गुरुवारी समोर आला. यात खिळे काढतानाचे दृष्य दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Delhi police said nails fixed near barricades at ghazipur border in uttar pradesh repositioned  | गाझीपूर बॉर्डरवर खिळे काढतानाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? पोलिसांनी सांगितलं...

गाझीपूर बॉर्डरवर खिळे काढतानाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? पोलिसांनी सांगितलं...

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील गाझीपूर बॉर्डरवरील रस्त्यांवर ठोकण्यात आलेले खिळे काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर आता दिल्लीपोलिसांनी स्पष्टिकरण दिले आहे. हे खिळे काढण्यात येत नसून, ते व्यवस्थित केले जात आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर सीमेवरील स्थिती पूर्वीसारखीच आहे. त्यात कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. हे खिळे लावल्यावरून दिल्ली पोलिसांना सोशल मीडिया आणि राजकीय स्थरावरही मोठ्या टीकांचा सामना करावा लागला आहे. 

हे खिळे काढतानाचा एक व्हिडो गुरुवारी समोर आला. यात खिळे काढतानाचे दृष्य दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर स्पष्टिकरण देत दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे, की सीमेवरील स्थिती पूर्वीप्रमाणेच आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेयर करून गाझीपूर बॉर्डरवरील खिळे काढले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे चुकीचे आहे. हे खिळे काढण्यात येत नसून, व्यवस्थित केले जात आहेत. 

डेलिगेशन गाझीपूर बॉर्डरवर -
आज गुरुवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे एक प्रतिनिधिमंडळ शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गाझीपूर बॉर्डरवर पोहोचले आहे. मात्र, या प्रतिनिधिमंडळातील नेत्यांना दिल्ली बॉर्डरवरच अटक करण्यात आली. तेसेच त्यांना आंदोलकांना भेटण्याची परवाणगी देण्यात आली नाही. 

या प्रतिनिधिमंडळातील माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी म्हटले आहे, की बॉर्डरवर तीन किलोमीटरपर्यंत बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. अम्हाला शेतकऱ्यांना भेटण्यापूसन रोखण्यात आले आहे. 13 लेवलची बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. या प्रतिनिधीमंडळात, कौर यांच्या शिवाय एनसीपी खासदार सुप्रिया सुळे, डीएमके खासदार कनिमोझी, टीएमसी खासदार सौगत रॉय यांच्यासह अनेक नेते सामील आहेत.

आंदोलकांना रोखण्यासाठी ठोकले खिळे -
प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीतदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी आता अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. या आंदोलकांना पुन्हा दिल्लीत खुसण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर गाझीपूर बॉर्डरच्या चारही बाजूंनी सीमेंटचे बॅरिकेडदेखील तयार करण्यात आले आहेत. तसेच रस्त्यांवर खिळेदेखील ठोकण्यात आले आहेत. याशिवाय, तारांच्या सहाय्यानेही बॉर्डरला घेरण्यात आले आहे.

Web Title: Delhi police said nails fixed near barricades at ghazipur border in uttar pradesh repositioned 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.