बापरे! बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या आजी अन्..; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:04 AM2020-07-17T11:04:19+5:302020-07-17T11:21:09+5:30

घरातील डबल बेडच्या बॉक्समध्ये एक 84 वर्षांच्या आजी चुकून लॉक झाल्या. CCTV तून हा धक्कादायक प्रकार समोर आला.

delhi police saved life of elderly woman locked in the bed box | बापरे! बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या आजी अन्..; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

बापरे! बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या आजी अन्..; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’ सुरू आहे याचदरम्यान पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. अशीच एक घटना दिल्लीत घडली आहे. घरातील डबल  बेडच्या बॉक्समध्ये एक 84 वर्षांच्या आजी चुकून लॉक झाल्या. CCTV तून हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर नातीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी लगेचच दाखल झाल्याने आजींचा जीव वाचला आहे. कुटुंबासाठी पोलीस देवदूत ठरले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या प्रसाद नगरमधील ही घटना आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला आहे. आजी घरात एकट्याच राहतात. याच दरम्यान त्यांनी घरातील डबल बेडचा बॉक्स उघडला आणि त्या चुकून लॉक झाल्या. तातडीने याबाबत त्यांच्या नातीने पोलिसांना फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुखरूपरित्या आजींना बाहेर काढले आणि त्यांचा जीव वाचवला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या अलकनंदा परिसरातून नॅन्सी नावाच्या महिलेने पोलिसांना फोन केला. तिची 84 वर्षांची आजी करोलबागच्या देव नगरमध्ये राहते असं तिने पोलिसांनी सांगितलं. आजीच्या देखभालीसाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. तो कॅमेरा नॅन्सी मोबाईलवरुन पाहत असते. दुपारच्या वेळेस डबल बेडचा बॉक्स उघडत असताना आजीचा तोल गेला आणि ती बॉक्समध्ये पडली व लॉक झाली असे नॅन्सीने पोलिसांना फोनवर सांगितले.

नॅन्सीने घटनेचा माहिती देताच पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पोलिसांनी तो तोडण्याचा निर्णय घेतला. डबल बेडचा बॉक्स उघडून त्यांनी आजीला बाहेर काढलं. काही मिनिटे तोड गेल्याने आजी आतमध्ये अडकून होत्या. जास्त वय असल्याने त्यांना बाहेर येणं शक्य होत नव्हतं. नॅन्सी आणि तिचे पतीही घटनास्थळी पोहोचले. एका फोनवर तातडीने पावलं उचलणाऱ्या पोलिसांचे त्यांनी आभार मानले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत आढळले तब्बल 68,428 नवे रुग्ण

Rajasthan Political Crisis : "काँग्रेस व्हेंटिलेटरवर, प्लाझ्मा थेरपी किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही"

CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : बापरे! कोरोनाग्रस्ताला आली पान मसाल्याची तलफ, रुग्णालयातून काढला पळ अन्...

CoronaVirus News : कोरोना वॉरियर महिला अधिकाऱ्याचा मृत्यू; कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम

Web Title: delhi police saved life of elderly woman locked in the bed box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.