Delhi Politics: भाजपने मनीष सिसोदियांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण...; अरविंद केजरीवालांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 02:45 PM2022-08-25T14:45:41+5:302022-08-25T14:45:51+5:30

Delhi Politics: दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी भाजपने 800 कोटी जमवले-आपचा गंभीर आरोप

Delhi Politics: BJP offers Chief Ministership to Manish Sisodia; Arvind Kejriwal's allegation | Delhi Politics: भाजपने मनीष सिसोदियांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण...; अरविंद केजरीवालांचा गौप्यस्फोट

Delhi Politics: भाजपने मनीष सिसोदियांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण...; अरविंद केजरीवालांचा गौप्यस्फोट

Next


दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व आमदार राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीवर पोहोचले. यानंतर माध्यमांशी बोलताना केजरीवालांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, भाजपने मनीष सिसोदिया यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

सिसोदियांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले की, भाजपने मनीष सिसोदिया यांच्याशी संपर्क केला होता, अरविंद केजरीवालांची साथ सोडून भाजपमध्ये आल्यावर मुख्यमंत्री करू, अशी ऑफर भाजपने दिल्याचा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी केला. तसेच, भाजपमध्ये आल्यावर सिसोदियांविरोधातील सर्व केसेसे मागे घेतल्या जातील, अशीही ऑफर दिल्याचे केजरीवालांनी सांगितले. 

सिसोदियांचा भाजपला नकार
केजरीवाल पुढे म्हणाले की, सिसोदिया यांनी तात्काळ भाजपची ऑफर धुडकाऊन लावली. मी मागच्या जन्मी पुन्याचे काम केले असेल, म्हणूनच मला सिसोदियांसारका साथी मिळाला. सिसोदिया यांनी नकार दिल्यानंतर आता ते आमच्या आमदारांना पैसे देऊन पक्षात येण्यास सांगत आहेत. त्यांनी आमच्या 40 आमदारांना 20-20 कोटींची ऑफर दिली, पण आमचा एकही आमदार फुटला नाही, असा दावाही केजरीवालांनी यावेळी केला. 

Web Title: Delhi Politics: BJP offers Chief Ministership to Manish Sisodia; Arvind Kejriwal's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.