"आमदार-खासदार-नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी", AAP नेत्याची BJP वर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 08:09 PM2024-08-30T20:09:34+5:302024-08-30T20:10:06+5:30

Delhi Politics : आप खासदार संजय सिंह यांनी भाजपवर दिल्लीत ऑपरेशन लोटस चालवलण्याचा आरोप केला आहे.

Delhi Politics : "Gang kidnapping MLAs, MPs and corporators", AAP leader slams BJP | "आमदार-खासदार-नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी", AAP नेत्याची BJP वर बोचरी टीका

"आमदार-खासदार-नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी", AAP नेत्याची BJP वर बोचरी टीका

Delhi Politics : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहेत. समोरच्या पक्षातील आमदार, नगरसेवकाला आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे. यामध्ये भाजप वरचड होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने आम आदमी पक्षाच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा 'आप'साठी मोठा धक्का होता. मात्र या पाचपैकी एक नगरसेवक पुन्हा स्वगृही परतला आहे. दरम्यान, आता आपने भाजपवर घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. 

पक्षाचे नगरसेवक भाजपमध्ये गेल्यामुळे आपने भाजपवर ऑपरेशन लोटस चालवल्याचा आरोप केला आहे. आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, आमचे निवडणूक चिन्ह झाडू आहे. ज्यांच्या मनात सत्तेची नशा आहे, त्यांना झाडू मारुन दिल्लीची जनता दुरुस्त करेल. झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, अरुणाचल आणि उत्तराखंडमध्ये भाजपने जो फॉर्म्युला वापरुन सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तो फॉर्म्युला इथे यशस्वी होणार नाही. 

संजय सिंह यांना विचारण्यात आले की, आम आदमी पक्षातील आणखी आमदार आणि नगरसेवक भाजपमध्ये सामील होण्याची भीती आहे का? त्यावर ते म्हणाले, त्यांच्याकडे दुसरे काही आहे का? जनतेने त्यांना नाकारले आहे, म्हणूनच आता ते ईडी-सीबीआयचा वापर करत आहेत. भाजप हतबल झालेला पक्ष आहे. ही तर आमदार, खासदार आणि नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी आहे, अशी बोचरी टीकाही संजय सिंह यांनी यावेळी केली. 

भाजपचा पलटवार
दरम्यान, आम आदमी पार्टीच्या या आरोपांवर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, आम आदमी पार्टीच हतबल आहे आणि त्यामुळेच ते अशी विधाने करत आहे. जामिनावर सुटलेल्या संजय सिंह यांच्यामुळे त्रासलेले नगरसेवक भाजपमध्ये येत आहेत आणि आपवाले याला अपहरण म्हणतात. मुख्यमंत्री तुरुंगात आहेत, उपमुख्यमंत्री जामिनावर आहेत, संजय सिंग स्वत: जामिनावर आहेत आणि अशी भाषा वापरत आहेत. येणाऱ्या काळात जनता त्याला योग्य प्रतिसाद देईल, अशी टीका सचदेवा यांनी केली.

Web Title: Delhi Politics : "Gang kidnapping MLAs, MPs and corporators", AAP leader slams BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.