Delhi Election 2020 : 'आप' विरोधात भाजपाचे 200 खासदार मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 08:11 AM2020-01-29T08:11:45+5:302020-01-29T08:16:48+5:30
Delhi Election 2020 : आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी भाजपाने तगडी फौज मैदानात उतरवली आहे.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी भाजपाने तगडी फौज मैदानात उतरवली आहे. तब्बल 200 खासदार, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्यात आले आहे. ही 250 जणांची फौज हरवण्यासाठी येत असल्याची टीका आपने केली आहे. दिल्लीतील 70 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराने वेग घेतला आहे.
सत्ताधारी आप, केंद्रात सत्तेत असलेला भाजपा आणि दोन्हीकडे विरोधी पक्ष असलेला काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली आहे. भाजपाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी करणार असल्याचं चित्र आहे. तब्बल 200, खासदार, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी येत आहेत. हे सर्व जण आपला हरवण्यासाठी मुक्काम ठोकणार असल्याचा जोरदार प्रचार आपच्या वतीने सध्या सुरू झाला आहे. सोशल मीडियासह विविध ठिकाणी आपद्वारे भाजपावर निशाणा साधला जात आहे.
"भाजपा के 200 सांसद, 70 केंद्रीय मंत्री और 11 मुख्यमंत्री दिल्ली आ रहे हैं।
— AAP (@AamAadmiParty) January 28, 2020
भाजपा के करीब 250 बड़े नेता दिल्लीवालों को हराने के लिए आ रहे है, दिल्ली के बेटे केजरीवाल को हराने के लिए आ रहे है" : @ArvindKejriwal#KejriwalvsEntireBJPpic.twitter.com/kvwuAdtjhe
आप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांना भाजपा घाबरला असून पंतप्रधान मोदी यांचा अपवाद वगळता सर्वांनाच प्रचाराच सक्रिय करण्यात आले आहे. मात्र दिल्लीकर मतदार हे सूज्ञ असून ते केजरीवाल यांना मत देतील असा दावा आपने केला आहे. केजरीवाल विरुद्ध भाजपा असे फोटो आणि टॅगलाईनमधून आपकडून भाजपाचा खरपूस समाचार घेतला जात आहे. दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे असून आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचं पारडं जड आहे. रिक्षावालेही केजरीवाल यांचा प्रचार करत आहेत. पण, एका रिक्षावाल्यास केजरीवाल यांचा प्रचार चांगलाच महागात पडला. कारण, दिल्ली पोलिसांनी संबंधित रिक्षावाल्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
'आय लव्ह केजरीवाल' स्टीकर रिक्षावर चिकटवलं, पोलिसांनी 10 हजारांचं चलन फाडलं https://t.co/jbbFBgLxUB
— Lokmat (@MiLOKMAT) January 28, 2020
एका रिक्षावाल्याने केजरीवाल यांच्या प्रचारार्थ आय लव्ह केजरीवाल अशा आशयाचे स्टीकर रिक्षावर लावले होते. त्यामुळे, संबंधित रिक्षावाल्याकडून वाहतूक पोलिसांनी चक्क 10 हजार रुपयांचे चलन फाडले. वाहतूक पोलिसांच्या या मनमानी कारभाराविरोधात रिक्षावाल्याने थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. कुठल्या नियमांतर्गत हे चलन फाडले, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला आहे. 3 मार्च रोजी या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, ही घटना गेल्यावर्षीची असून केजरीवाल यांनीही ट्विट करुन याबाबत प्रश्न विचारला होता.
महरौली और छतरपुर की जनता 'आप' के साथ चल रही है। आज दोनों क्षेत्रों के रोड शो में लोगों का बहुत प्यार और समर्थन मिला। pic.twitter.com/GP2CYD6tLX
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 28, 2020
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल म्हणाले की, 'मी गेल्या काही दिवसांपासून पाहत आहे की, अमित शहा आपल्या प्रचार सभेमध्ये दिल्लीकरांचा अपमान करत आहेत. दिल्लीकरांनी आपल्या मेहनतीने शाळा, रुग्णालय सुधारली आहेत. मात्र अमित शहा हे दिल्लीतील शाळांचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान करत आहे'. त्यामुळे बरेच पालक दुखावले असल्याचा दावा सुद्धा केजरीवाल यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
विचित्र अपघात : रिक्षासह एसटी बस विहिरीत; 25 प्रवासी ठार, 30 जखमी
चीनमधील भारतीयांना विमानाने आणणार; कोरोनाग्रस्त वुहानमध्ये २५0 विद्यार्थी
‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती
सलग तीन दिवस बँका राहणार बंद, इंडियन बँक असोसिएशनने दिली संपाची हाक