Delhi Pollution : दिल्लीत आजही प्रदूषणाने केला कहर, एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 08:35 AM2019-11-22T08:35:56+5:302019-11-22T08:37:24+5:30
दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिल्लीत आजही प्रदूषणाने कहर केला असून एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतीलप्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिल्लीत आजही प्रदूषणाने कहर केला असून एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर लोकसभेत चर्चा झाली. यामध्ये पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री खोकत होते, आता दिल्लीतील सर्व लोकं खोकत असल्याचे सांगत भाजपाचे खासदार प्रवेश साहिब सिंह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
दिल्लीच्या वातावरणात शेजारच्या राज्यांमध्ये पेंड्या जाळल्यामुळे प्रदूषणात 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदूषित हवेचा पट्टा निर्माण झाला आहे. तीन महिन्यांनंतर दिल्लीतील हवेच्या प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. पंजाब, हरयाणातील पराली जाळली जात असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी 10 सदस्यीय समितीने कृती आराखडा तयार केला आहे. राजधानीतील हवा काही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेच्या त्रास नागरिकांना बसू नये यासाठी दिल्लीकरांना मास्क वाटण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Delhi: Major pollutants PM 2.5 at 261 in 'Moderate' category and PM 10 at 249 in 'Moderate' category, in Lodhi Road area, according to the Air Quality Index (AQI) data. pic.twitter.com/3t9cExUYfM
— ANI (@ANI) November 22, 2019
दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. या नियमाच्या कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले होते. तसेच गरज भासल्यास आणखी काही दिवस सम-विषम नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली होती. मात्र आता प्रदूषण कमी झाल्याने याची गरज नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
Delhi: Hoardings, with 'Dilli Jal Board ke adhyaksh jawab dein' written on them, seen in the national capital. In rankings released by Bureau of Indian Standards on quality of tap water, Delhi is at the bottom. pic.twitter.com/ASu3ni5iMX
— ANI (@ANI) November 21, 2019
दिल्लीत हवाच नव्हे, पिण्याचे पाणीही अशुद्ध
दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी दिली. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) 20 राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले.इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील पाणी खराब असल्याचे दिसून आले. यावेळी रामविलास पासवान म्हणाले,"आम्ही कोणत्याही सरकारला दोष देत नाही. या विषयावरून आम्ही राजकारण करत नाही. तर आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे." देशातील शहरांमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी यापुढे सुद्धा केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व राजधानींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले.