Delhi Pollution : प्रदूषणामुळे अनेक देशांचे राजदूत दिल्ली सोडून जाण्याच्या मार्गावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 04:56 PM2017-11-17T16:56:22+5:302017-11-17T17:04:08+5:30

दिल्लीतील हवामान दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. हवेतील प्रदूषण येथील लोकांच्या आरोग्यासाठी हानीकारक होत आहे. या प्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेत पडले आहेत.

Delhi Pollution: Because of the pollution many envoys of many countries are leaving Delhi on the way | Delhi Pollution : प्रदूषणामुळे अनेक देशांचे राजदूत दिल्ली सोडून जाण्याच्या मार्गावर 

Delhi Pollution : प्रदूषणामुळे अनेक देशांचे राजदूत दिल्ली सोडून जाण्याच्या मार्गावर 

Next
ठळक मुद्देप्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेतदिल्लीतील प्रदूषणामुळे कोस्टारिकाच्या राजदूत आजारी प्रदूषणाच्या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ला

नवी दिल्ली : दिल्लीतील हवामान दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. हवेतील प्रदूषण येथील लोकांच्या आरोग्यासाठी हानीकारक होत आहे. या प्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेत पडले आहेत. अनेक लोक दिल्ली शहरातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, दिल्लीत असलेल्या विविध देशांच्या राजदूतांनीही दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 
ताजे उदाहरण म्हणजे, कोस्टारिका या देशाचे राजदूत कार्यालय दिल्लीत आहे. कोस्टारिकाच्या राजदूत मॅरिएला क्रूज अल्वारेज यांनी दिल्लीतील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. येथील प्रदूषणामुळे त्या आजारी पडल्या आहेत. तसेच, या प्रदूषणाला कंटाळून त्या बंगळुरुला दाखल झाल्या आहेत. याबाबत स्वत: मॅरिएला क्रूज अल्वारेज यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे. 
मॅरिएला क्रूज अल्वारेज ब्लॉगवर, दिल्लीतील प्रदूषणामुळे माझी तब्येत खराब झाली आहे. ही माहिती मला समजल्यानंतर मी बंगळुरुला दाखल झाले, असे लिहिले आहेत. तसेच, इतरांनाही प्रदूषणाच्या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, प्रदूषणामुळे पृथ्वी नष्ट होत चालली आहे. मी भारतावर प्रेम करते, पण प्रदूषणामुळे आजारी पडली आहे. प्रदुषणाचा सामना करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत, असेही मॅरिएला क्रूज अल्वारेज यांनी म्हटले आहे.  
याशिवाय दिल्लीत खराब वातावरणामुळे थायलंडचे राजदूत चुटीटरोन गोंगसकदी यांनी गेल्या महिन्यात बॅंकाकमधील अधिका-यांना पत्र पाठवून दिल्लीत राहण्यासाठी हार्डशिप अलाउन्स देण्याची मागणी केली होती. तसेच, मॅक्सिकोच्या राजदूत मेल्बा प्रिया यांनी सुद्धा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिल्लीत प्रदूषणामुळे राहणे मुश्कील होत असल्याचे म्हटले होते.  

Web Title: Delhi Pollution: Because of the pollution many envoys of many countries are leaving Delhi on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.