प्रदुषणामुळे दिल्ली पुन्हा संकटात, पर्यावरण मंत्र्यांनी केलं 'वर्क फ्रॉम होम'चं आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:41 PM2022-11-02T12:41:57+5:302022-11-02T12:42:47+5:30

दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदुषणाचं संकट आता पुन्हा एकदा दिवसेंदिवस अधिक वाढू लागलं आहे.

delhi pollution environment minister gopal rai appealed for work from home | प्रदुषणामुळे दिल्ली पुन्हा संकटात, पर्यावरण मंत्र्यांनी केलं 'वर्क फ्रॉम होम'चं आवाहन!

प्रदुषणामुळे दिल्ली पुन्हा संकटात, पर्यावरण मंत्र्यांनी केलं 'वर्क फ्रॉम होम'चं आवाहन!

Next

नवी दिल्ली-

दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदुषणाचं संकट आता पुन्हा एकदा दिवसेंदिवस अधिक वाढू लागलं आहे. यातच आता दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत नागरिकांना 'वर्क फ्रॉम होम'चं आवाहन केलं आहे. यासोबतच जे व्यक्ती दररोज कामावर जात आहेत त्यांना बाइक किंवा कार शेअरिंगचा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे रस्त्यावर कमीत कमी वाहनं येतील आणि प्रदुषण कमी करण्यास कमी मदत होऊ शकेल.

पर्यावरण मंत्री गोपाल यांनी दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून प्रदुषणाची पातळी खालावत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीच नव्हे, तर उत्तर प्रदेश, हरियाणासह काही परिसरात हवेची गुणवत्ता खालावली आहे. १ नोव्हेंबर रोजी फरीदाबादमध्ये ४०३, मानेसरमध्ये ३९३, गुरुग्राम ३९०, बहादूर गडमध्ये ४००, सोनीपत ३५०, कॅथलमध्ये ३५०, ग्रेटर नोएडामध्ये ४०२, नोएडामध्ये ३९८, गाझियाबादमध्ये ३८१ इतकी AQI पातळी नोंदवली गेली होती. 

भाजपानं CAQM चा आदेश पाळला नाही- गोपाल राय
दिल्लीत काल अँटी डस्ट अभियानाअंतर्गत निरीक्षण करण्यात आलं. यात L&T च्या साइटवर पडद्याआडून बांधकाम सुरू होतं. माती मोकळी पडलेली होती. तसंच अँटी स्मॉग गन देखील वापरण्यात आली नव्हती. त्यानंतर माहिती मिळाली की ते भाजपाचं कार्यालय उभारत आहेत. भाजपानं CAQM च्या आदेशांचं पालन केलं नाही, असा खळबळजनक आरोप गोपाल राय यांनी केला आहे. 

ज्या ठिकाणी बांधकामाचं काम सुरू असल्याचं दिसून येईल त्याचे फोटो काढून ग्रीन अॅपवर पाठवण्याचं आवाहन देखील गोपाल राय यांनी यावेळी केलं. काल भाजपाच्या कार्यालयात बांधकाम सुरू होतं. भाजपावाले इतरही काही ठिकाणी असं काम करत असतील, असाही आरोप त्यांनी केला आहे. कोळसा आणि लाकडाचा वापर करु नये. त्यामुळे बायोमास बर्निंग होतं आणि मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं, असं गोपाल राय म्हणाले. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना इलेक्ट्रिक हिटर उपलब्ध करुन देण्यात यावा जेणेकरुन थंडीपासून वाचण्यासाठी खुल्या जागेत शेकोटी केली जाणार नाही आणि वायू प्रदुषण होणार नाही.

Web Title: delhi pollution environment minister gopal rai appealed for work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.