दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्बची सूचना, IGI एअरपोर्टवर सर्च ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 09:46 PM2023-01-12T21:46:16+5:302023-01-12T21:49:06+5:30
गुरुवारी सायंकाळी जवळपास 07:07 वाजता एओसीसी (AOCC) ने (SOCC) ला दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइट SG 8938 मध्ये बॉम्ब आढळल्याची सूचना दिली होती.
नवी दिल्ली - दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर (Delhi IGI Airport) विमानात बॉम्ब असल्याची सूचना आल्याने गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पुण्याला रवाणा होणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना आहे. यासंदर्भात माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. गुरुवारी सायंकाळी जवळपास 07:07 वाजता एओसीसी (AOCC) ने (SOCC) ला दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइट SG 8938 मध्ये बॉम्ब आढळल्याची सूचना दिली होती.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक फोन कॉल आला होता. त्यावरून दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. महत्वाचे म्हणजे, हे विमान दिल्ली एअरपोर्टवरून पुण्याच्या दिशेने झेपावणारच होते, तेवढ्या ही सूचना मिळाली. यानंतर, सुरक्षा यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्या आणि त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले.
#UPDATE | Bomb call on Delhi-Pune Spicejet flight at IGI Airport | Delhi Police say, "So far nothing suspicious has been found but security drill will be followed as per SOP."
— ANI (@ANI) January 12, 2023
याच बरोबर, सध्या विमानात संशयास्पत असे काहीही आढळलेले नाही. मात्र, सुरक्षा यंत्रनांच्या देखरेखीखाली सिक्योरिटी ड्रिलचे पालन केले जात आहे. प्रवाशांना विमानातून काढण्यात आले आहे आणि एअरपोर्टवर फ्लाइटची चेकिंग केली जात आहे, असेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.