मोठी बातमी! दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती, सर्व प्रवासी उतरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:50 AM2023-08-18T11:50:22+5:302023-08-18T11:51:20+5:30
दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी सकाळी दिल्ली विमानतळावरील फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्ये ही धमकी देण्यात आली होती, त्यानंतर विमानतळावरच फ्लाइटची चौकशी सुरू झाली आहे. विमानात बॉम्ब असल्याची माहिती जीएमआर केंद्राला देण्यात आली. बॉम्बची माहिती मिळताच सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह विमानातून उतरवण्यात आले.
Bomb threat on Delhi-Pune Vistara flight at Delhi airport. Inspection of the aircraft is underway in the isolation bay at the airport. All passengers along with their luggage have been deboarded safely. A call regarding a bomb on the flight was received by the GMR call centre…
— ANI (@ANI) August 18, 2023
विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची ही पहिलीच वेळ नाही. जूनमध्ये, एक व्यक्ती दिल्लीहून दुबईला जात असताना त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे त्याने रागाने सांगितले. शेजारी बसलेल्या एका महिला प्रवाशाने ते चुकीचं ऐकलं आणि घाबरली. त्यांनी अलार्म लावला आणि केबिन क्रूला बोलावले. दिल्ली विमानतळावरच या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
दिल्ली-मुंबई विस्तारा विमानाच्या या घटनेनंतर प्रवाशांना विमान उशिराला जावे लागले. या व्यक्तीला सीआयएसएफने ताब्यात घेतले. नंतर असे आढळून आले की तो व्यक्ती आपल्या आईशी फोनवर बोलत होता. या व्यक्तीने आपल्या बॅगेत नारळ ठेवला होता आणि सुरक्षा रक्षकाने त्यावर आक्षेप घेतल्यावर त्यांनी चौकशी केली. याबाबत तो व्यक्ती आपल्या आईला सांगत होता की, बॉम्बचा धोका असल्याचे समजून गार्डने नारळ नेण्यास परवानगी दिली नाही, पण पान मसाला खाण्यास परवानगी दिली आहे. दुबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या शेजारी बसलेल्या महिलेने 'बॉम्ब' ऐकला आणि अलार्म लावला. ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही प्रवाशांना फ्लाइटमधून उतरवून फ्लाइटची तपासणी केली असता काहीही आढळून आले नाही.