वडिलांचा हात सुटला अन् गर्दीने चेंगरले; चिमुकलीच्या डोक्यात लोखंडी रॉड घुसून मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 19:08 IST2025-02-16T19:01:29+5:302025-02-16T19:08:35+5:30
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत सात वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

वडिलांचा हात सुटला अन् गर्दीने चेंगरले; चिमुकलीच्या डोक्यात लोखंडी रॉड घुसून मृत्यू...
Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला, अनेकजण गंभीर जखमी झाले. यात सागरपूर येथील 7 वर्षीय रिया नावाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. आपल्या चिमुकल्या मुलीच्या मृत्यूचे वेदनादायक दृश्य आठवून वडील ओपिल सिंग भावूक झाले. अशा अवस्थेत त्यांनी घडलेली घटना सांगितली.
ओपिल सिंग आपल्या कुटुंबासह प्लॅटफॉर्मवर उभे होते, यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. गर्दी पाहून त्यांनी प्रयागराजला जाणारी ट्रेन सोडली आणि घरी परतण्यासाठी पुलाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. यावेळी पायऱ्यांवरही शेकडो लोक जमले अन् त्यांच्या हातातून मुलीचा हात निसटला. गर्दी पाहून रिया पायऱ्यांवर कोपऱ्यात उभी राहिली, यावेळी गर्दीच्या दबावामुळे लोखंडी रॉड तिच्या डोक्यात घुसला.
यानंतर तिला रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी इकडे-तिकडे धाव घेतली, पण मदत मिळाली नाही. अर्ध्या तासानंतर त्यांनी कसेबसे मुलीला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ओपिल सिंग यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुली होत्या, ज्यात रिया ही धाकटी मुलगी होती. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.