Delhi Rain: ग्रेटर नोएडामध्ये पावसामुळे रस्ता खचला, खड्डा पडला, जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 02:24 PM2022-10-09T14:24:31+5:302022-10-09T14:34:04+5:30

पावसामुळे ग्रेटर नोएडा पश्चिम येथे रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर-१ मध्ये असलेल्या एक्स्प्रेस इमारतीजवळ मध्ये सुरू असलेल्या खोदकामाजवळ जमीन खाली दबली आहे.

Delhi Rain landslide due to heavy rain in Greater Noida | Delhi Rain: ग्रेटर नोएडामध्ये पावसामुळे रस्ता खचला, खड्डा पडला, जीवितहानी नाही

Delhi Rain: ग्रेटर नोएडामध्ये पावसामुळे रस्ता खचला, खड्डा पडला, जीवितहानी नाही

googlenewsNext

नोएडा : पावसामुळे ग्रेटर नोएडा पश्चिम येथे रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर-१ मध्ये असलेल्या एक्स्प्रेस इमारतीजवळ मध्ये सुरू असलेल्या खोदकामाजवळ जमीन खाली दबली आहे. यात रस्त्याचा मोठा भाग जमिनीखाली गेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या घटनेची माहिती नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिली. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील सेक्टर-१ रिअॅलिटी हॉस्पिटलजवळ एक्स्प्रेस एक्स्ट्रा या बांधकामाधीन इमारतीमध्ये हा अपघात झाला. दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने अपघातस्थळी लोक उपस्थित नव्हते. त्यामुळे जिवीतहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

ग्रेटर नोएडा पश्चिम येथील सेक्टर-१ रिअॅलिटी हॉस्पिटलजवळ एक्स्प्रेस एक्स्ट्रा या बांधकामाधीन इमारतीजवळ हा अपघात झाला. दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने अपघातस्थळी लोक उपस्थित नव्हते. त्यामुळे यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 

काय ती आरोग्य व्यवस्था..! हाड मोडलेल्या व्यक्तीच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा

गेल्या दोन दिवसापासून दिल्लीसह नोएडा परिसरात मुसळदार पाऊस सुरू आहे.  हवामान विभागाने आणखी दोन दिवसासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरापासून ग्रामीण भागात सखल भागात पाणी साचले आहे. शेतात भात पीक काढणी सुरू आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

Web Title: Delhi Rain landslide due to heavy rain in Greater Noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.