BREAKING: दिल्लीत कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू; देशात कोरोनाचा दुसरा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:49 PM2020-03-13T22:49:20+5:302020-03-13T23:12:29+5:30
कोरोनाग्रस्त महिलेचा दिल्लीतल्या आरएमएल रुग्णालयात मृत्यू
नवी दिल्ली: कोरोनामुळे दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा हा दुसरा बळी ठरला आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये कोरोनामुळे एका ७६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर आता दिल्लीत एका ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेला तिच्या मुलाकडून कोरोनाचा संसर्ग झाला. महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वीच जपान, जिनिव्हा आणि इटलीमधून प्रवास करून मायदेशी परतला होता. सुदैवानं त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही.
Health Secretary Preeti Sudan: An over 65-year-old #Coronavirus patient passes away at a Delhi hospital; This is the second death in India due to Coronavirus pic.twitter.com/3L8IvtPtrJ
— ANI (@ANI) March 13, 2020
देशात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. तर कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा ८४ वर जाऊन पोहोचला आहे. यातले १७ परदेशी नागरिक आहेत. महाराष्ट्रातल्या १८ जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. तर केरळमध्ये २२, हरयाणात १५, उत्तर प्रदेशात ११, कर्नाटकात ७, राजस्थान, लडाखमध्ये प्रत्येकी ३, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.
Delhi: Death of a 68-year-old woman from West Delhi (mother of a confirmed case of COVID-19), is confirmed to be caused due to co-morbidity (diabetes and hypertension). She also tested positive for COVID-19. https://t.co/hmqARvTVv5
— ANI (@ANI) March 13, 2020
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आहेत. पुण्यात १० कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. नागपूर, मुंबईत कोरोनाचे प्रत्येकी ३ रुग्ण आढळले असून ठाण्यात एक रुग्ण सापडला आहे. याशिवाय अहमदनगरमध्येही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.