'आयबी'च्या अंकित शर्मावर हल्ला करणारे देत होते, 'जय श्रीराम'चे नारे; भाऊ अंकूर शर्माचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 02:01 PM2020-02-29T14:01:16+5:302020-02-29T19:19:43+5:30

अंकितच्या कुटुंबीयांनी अंकितच्या हत्येचा आरोप आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर लावला आहे. हुसेन यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

delhi riots ankit sharms brother made alligation that crowd who killed his brother was chanting jai shree ram | 'आयबी'च्या अंकित शर्मावर हल्ला करणारे देत होते, 'जय श्रीराम'चे नारे; भाऊ अंकूर शर्माचा दावा

'आयबी'च्या अंकित शर्मावर हल्ला करणारे देत होते, 'जय श्रीराम'चे नारे; भाऊ अंकूर शर्माचा दावा

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसेत आतापर्यंत 42 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हिंसेत इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीच्या अंकित शर्मा या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अंकितच्या मृत्यू संदर्भात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अंकित यांचे भाऊ अंकूर शर्मा यांनी आता नवीन खुलासा केला आहे. 

अंकूर शर्मा यांनी सांगितले की, ज्या लोकांनी अंकितला ठार केले, ते लोक 'जय श्रीराम'चे नारे देत होते. त्यांच्या हातात तलवारी होत्या. 'द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार अंकितच्या भावाने सांगितले की, अंकित जेव्हा घरी परतत होता त्यावेळी हिंसा करणाऱ्या एका समूहाने दगडफेक सुरू केली आणि त्याला एका गल्लीत नेले.

हिंसा करणाऱ्यांकडे दगड, काठ्या, चाकू आणि तलवारी होत्या. ते जोरजोरात जय श्रीराम, जय श्रीरामचे नारे लावत होते. यापैकी काहींनी हेल्मेट परिधान केलेले होते. यावेळी जे लोक अंकितची मदत करण्यासाठी समोर आले त्यांच्यावर देखील या लोकांनी हल्ला केल्याचे अंकूर शर्मांनी सांगितले. 

घटनेच्या दुसऱ्या दिवशी अंकित शर्माचा मृतदेह एका नाल्यात सापडला. तर अंकितच्या कुटुंबीयांनी अंकितच्या हत्येचा आरोप आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर लावला आहे. हुसेन यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
 

Web Title: delhi riots ankit sharms brother made alligation that crowd who killed his brother was chanting jai shree ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.