दिल्लीचा रॉबिनहूड! श्रीमंतांकडे चोरी करून करायचा गरिबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 05:54 PM2017-07-18T17:54:28+5:302017-07-18T17:57:30+5:30
श्रीमंतांकडे चोरी करून गोरगरिबांना मदत करणाऱ्या रॉबिनहूडविषयी तुम्ही ऐकलंच असेल. पण असाच अजब चोर दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - श्रीमंतांकडे चोरी करून गोरगरिबांना मदत करणाऱ्या रॉबिनहूडविषयी तुम्ही ऐकलंच असेल. पण असाच अजब चोर दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. स्वत:ला दिल्लीचा रॉबिनहूड समजणारा हा चोर रात्री श्रीमंतांच्या घरी जाऊन मौल्यवान ऐवज रोख रक्कम चोरायचा आणि नंतर बिहारमधील आपल्या गावी जाऊन गोरगरिबांना मदत करायचा. या चोराने अनेक गरिबांना लग्नासाठी पैसे दिल्याचेही समोर आले आहे.
दक्षिण पूर्व दिल्लीडे डीसीपी रोमिल बनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, "इरफान उर्फ उजाला ऊर्फ आर्यन (२७) हा युवक दिल्लीत राहायचा. त्याने गेल्या काही महिन्यात दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलोनी, जामिया नगर आणि लाजपतनगर भागात १२ हून अधिक चोऱ्या केल्या आहेत. न्यू फ्रेंड्स कॉलनीतील राजीव खन्ना यांच्या घरीसुद्धा चोरीची अशीच घटना घडली होती. त्या चोरीचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती दिसली. त्या चेहऱ्याचा शोध घेत पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन एका चोराला ताब्यात घेतले."
अधिक वाचा
अधिक वाचा
( ऐशोआरामासाठी राष्ट्रीय कराटेपटू बनला दुचाकी चोर ! )
(ट्राफिकमध्ये अडकल्याने BMW रस्त्यावर सोडून चोर फरार )
(हाय-प्रोफाइल बाइकचोर अटकेत )
मात्र स्थानिक रहिवाशांनी सदर तरुण चोर नसून समाजसेवक असल्याचे सांगितल्यावर पोलिसांना धक्का बसला. दरम्यान, इरफानकडून चोरीचा माल खरेदी करणाऱ्या धर्मेंद्र यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
(ट्राफिकमध्ये अडकल्याने BMW रस्त्यावर सोडून चोर फरार )
(हाय-प्रोफाइल बाइकचोर अटकेत )
मात्र स्थानिक रहिवाशांनी सदर तरुण चोर नसून समाजसेवक असल्याचे सांगितल्यावर पोलिसांना धक्का बसला. दरम्यान, इरफानकडून चोरीचा माल खरेदी करणाऱ्या धर्मेंद्र यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
इरफान चोरीच्या मालातून येणाऱ्या रकमेतून गावात वैद्यकीय शिबीर, गरिबांना मदत अशी सामाजिक कार्येही करायचा. त्यामुळे काही लोक त्याला रॉबिनहूड म्हणूनही संबोधू लागले होते. आरोपी इरफान हा गोरगरिबांना मदत करण्याबरोबरच चोरीच्या पैशांमधून अय्याशी करत असल्याचेही उघड झाले आहे. त्याने दिल्लीतील एका बारमध्ये आवडीचे गाणे ऐकण्यासाठी १० हजार रुपयांची ऑफर दिली होती. तसेच बाजारात येणाऱ्या नव्या कारपैकी आलिशान कारही त्याच्याकडे असायच्या.