2000 कोटी रुपयांचा घोटाळा! 'या' प्रकरणात मनीष सिसोदियांना अटक होण्याची AAP ला वाटतेय भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 09:18 PM2022-06-02T21:18:48+5:302022-06-02T21:19:56+5:30
माध्यमांसोबत बोलताना आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, सिसोदिया यांना अटक करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या सर्व तपास यंत्रणा, आयकर, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), दिल्ली पोलीस आणि सीबीआयला 'बनावट' प्रकरणांची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यानंतर, आता आपल्या सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक होऊ शकते. असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केला. एवढेच नाही, तर सिसोदिया यांना काही खोट्या प्रकरणात अडकवले जाऊ शकते, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. आता, सिसोदिया यांना कोणत्या प्रकरणात कारागृहात टाकले जाऊ शकते, हेही आम आदमी पक्षाने सांगितले आहे. आपने दावा केला आहे, की सिसोदिया यांना अडकवण्यासाठी केंद्राने 3 वर्षांपूर्वीचे जुने प्रकरण उकरून काढण्याचा कट आखला आहे.
माध्यमांसोबत बोलताना आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, सिसोदिया यांना अटक करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या सर्व तपास यंत्रणा, आयकर, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), दिल्ली पोलीस आणि सीबीआयला 'बनावट' प्रकरणांची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
शाळांच्या कामांमध्ये घोटाळ्याची तक्रार -
यावेळी आतिशी यांनी कथित दस्तऐवज दाखवले, यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दिल्ली भाजपचे नेते हरीश खुराना आणि नीलकांत बक्षी यांच्याकडे त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात अधिकची माहिती आणि कागदपत्रे मागितली होती. या दोन्ही भाजप नेत्यांनी, सिसोदिया आणि जैन यांचा शाळांच्या बांधकामातील 2000 कोटी रुपयांचा घोटाळ्यात सहभाग होता, अशी तक्रार केली होती. ही तक्रार 2 जुलै 2019 रोजी नवी दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांकडे करण्यात आली होती. यानंतर ती एसीबीकडे कडे पाठविण्यात आली होती.
3 वर्षांपासूनकुठे होते प्रकरण -
आतिशी म्हणाल्या, “गेले 3 वर्षं हे प्रकरण कुठे होते? यात भ्रष्टाचार झालेला नाही हे सर्व यंत्रणांना माहीत आहे. यामुळे हे प्रकरण पुढे सरकलेच नाही. केंद्र आम आदमी पक्षाच्या आमदारांमागे लागले आहे?" असा सवालही यावेळी आतिशी यांनी केला.