दिल्लीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:21 AM2018-09-26T11:21:27+5:302018-09-26T12:43:21+5:30
दिल्लीतील अशोक विहार परिसरात एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील अशोक विहार परिसरात एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.
#UPDATE: Ashok Vihar building collapse: 2 children killed, total 8 people rescued out of which 3 are in critical condition; Search and rescue operation underway #Delhihttps://t.co/N76jCQPG4k
— ANI (@ANI) September 26, 2018
Delhi: Seven persons sent to hospital after a three-storey building collapsed near Sawan Park in Ashok Vihar Phase 3 today. Rescue teams sent to the spot. pic.twitter.com/CvnipChfdX
— ANI (@ANI) September 26, 2018
बुधवारी (26 सप्टेंबर) सकाळी दिल्लीच्या अशोक विहार परिसरातील सावन पार्कमधील तीन मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. इमारत अतिशय जूनी असल्याने कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Delhi: Two teams of National Disaster Response Force (NDRF) mobilised for Ashok Vihar where a three-storey building has collapsed. 9 persons including 3 children rescued https://t.co/N76jCQPG4k
— ANI (@ANI) September 26, 2018