दिल्ली : 'तिने' डॉक्टरांकडे मागितले मृत नव-याचे स्पर्म्स
By admin | Published: July 11, 2016 08:04 AM2016-07-11T08:04:04+5:302016-07-11T09:20:05+5:30
दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडे अलीकडेच एका मृत तरुणाच्या पत्नीने नेहमीपेक्षा वेगळी विनंती केली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडे अलीकडेच एका मृत तरुणाच्या पत्नीने नेहमीपेक्षा वेगळी विनंती केली. त्यामुळे एम्सचे डॉक्टरही चक्रावून गेले. तरुणाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने डॉक्टरांकडे त्याचे स्पर्म्स काढून देण्याची मागणी केली.
मृत नव-याच्या स्पर्म्सपासून गर्भवती रहाता यावे यासाठी तिने अशी मागणी केली होती. काही वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. त्यांना मूल झाले नव्हते. या महिलेच्या सासू-सास-यांनीही तिच्या या मागणीचे समर्थन केले असे डॉक्टरांनी सांगितले. पोस्टमार्टम स्पर्म रिट्रायव्हल (पीएमएसआर) म्हणजे मृत्यूनंतर स्पर्म काढून जतन करण्यासंबंधी कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्वे नसल्यामुळे डॉक्टरांनी तिची विनंती फेटाळून लावली.
जर्नल ऑफ हयुमन रिप्रोडक्टीव्ह सायन्स या एम्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जर्नलमध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. भविष्यात असे प्रसंग टाळण्यासाठी पीएमएसआरसंबंधी स्पष्ट दिशानिर्देश असावेत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे. ज्याचा व्यक्ती आणि समाजाला फायदा होऊ शकतो असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
माणसाच्या मृत्यूनंतर जवळपास दिवसभर स्पर्मसचे अस्तित्व टिकून असते. स्पर्म बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला फक्त पाच मिनिटांचा वेळ लागतो असे डॉक्टरांनी सांगितले. इस्त्रायलमध्ये मृत व्यक्तीच्या शरीरातून स्पर्मस काढण्याला परवानगी आहे. पत्नीच्या विनंतीवरुन डॉक्टर मृत नव-याच्या शरीरातून स्पर्म्स काढून त्याचे जतन करतात.
वर्षभरात हे स्पर्म्स पत्नीमध्ये सोडले जातात. ज्यामुळे ती आपल्या नव-यापासून गर्भवती राहते. या दरम्यान पत्नीचा मृत्यू झाला तर, स्पर्म्सचा वापर होत नाहीत.