दिल्ली हादरली; बिर्याणीसाठी ५५ वार केल्यावर तो नाचला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 05:55 AM2023-11-24T05:55:37+5:302023-11-24T05:56:25+5:30
दिल्ली हादरली, आरोपी १६ वर्षांचा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘क्राैर्याची परिसीमा’ हा शब्दही कमी पडेल एवढी भयंकर घटना राजधानी दिल्लीत घडली. बिर्याणीसाठी ३५० रुपये न दिल्यामुळे एका किशोरवयीन मुलाचा दुसऱ्याने (वय १६) अत्यंत अमानुष खून केला. आरोपीने मुलावर चाकूने तब्बल ५५ वार केले व नंतर गळा चिरून नाचत-नाचत मृतदेह रस्त्यावरून फरफटत नेला.
गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी गुरूवारी याची माहिती दिली. जनता मजदूर कॉलनीत मंगळवारी घडलेल्या या घटनेच्या २:२३ मिनिटांच्या फुटेजमध्ये आसपासच्या लोकांनी मध्ये पडू नये म्हणून आरोपी त्यांना धमकावताना दिसतो. बुधवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. मृत व आरोपीची एकमेकाशी ओळख नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.