सुशीलकुमारची किराणा दुकानदाराला मारहाण; स्टेडिअममध्ये साहित्य पुरवणाऱ्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 09:18 AM2021-05-31T09:18:03+5:302021-05-31T09:18:20+5:30
छत्रसाल स्टेडियममध्ये चार लाख रुपयांचे सामान पाठवल्यानंतर त्याच्या पैशांची मागणी केल्यानंतर सुशिल कुमार याने दुकानदार सतीश गोयल यांनाही मारहाण केल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे.
नवी दिल्ली : सागर धनखड हत्याकांडात अडकलेल्या दिग्गज पहेलवान सुशिलकुमार याच्यावर छत्रसाल स्टेडिअममध्ये खाद्य साहित्य पुरवणाऱ्या दुकानदारानेही आरोप केले आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये चार लाख रुपयांचे सामान पाठवल्यानंतर त्याच्या पैशांची मागणी केल्यानंतर सुशिल कुमार याने दुकानदार सतीश गोयल यांनाही मारहाण केल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे.
व्यापारी गोयल यांनी सांगितले की, सत्पाल हे प्रशिक्षक असतांनापासून या स्टेडिअममध्ये मी सामान पोहचवत होतो. २०२० मध्ये विरेंद्र नावाच्या प्रशिक्षकांनी साहित्य मागवले. त्यानंतर त्यांची बदली झाली. नंतर अशोक हे प्रशिक्षक बनले. माझी चार लाख रुपयांची बाकी होती. मी पैसे मागितले तेव्हा त्यांनी मला बोलावुन घेतले आणि बिल घेतले. दुसऱ्या दिवशी सुशिल कुमार याने बोलावुन घेतले. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, मला पैसे मिळाले नाही तर मी मरुन जाईन, सुशिल कुमार याने मला मारहाण केली तसेच इतर मल्लांनीही मारहाण केली. त्यानंतर मी खुप दिवस घराबाहेरच निघालो नाही. मला भिती होती की हे सर्वजण पुन्हा मला मारहाण करतील.’