बापरे! पगार मागितला म्हणून मालकिणीने अंगावर सोडला कुत्रा, चेहऱ्यावर 15 टाके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:43 PM2020-07-08T12:43:11+5:302020-07-08T12:50:23+5:30

पगार मागितला म्हणून एका मालकिणीने महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर कुत्रा सोडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 

delhi spa employee bitten by pet dog whe demand salary | बापरे! पगार मागितला म्हणून मालकिणीने अंगावर सोडला कुत्रा, चेहऱ्यावर 15 टाके

बापरे! पगार मागितला म्हणून मालकिणीने अंगावर सोडला कुत्रा, चेहऱ्यावर 15 टाके

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातचं काम गेलं आहे. असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत. तसेच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना दिल्लीमध्ये घडली आहे. पगार मागितला म्हणून एका मालकिणीने महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर कुत्रा सोडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीमधील मालविया नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. 11 जून रोजी ही घटना घडली असून कुत्र्याच्या हल्ल्यात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. चेहऱ्यावर आणि मानेवर तब्बल 15 टाके लागले आहेत. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एका स्पा मालकिणीला अटक केली आहे. पगार मागितला म्हणून महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर कुत्रा सोडल्याच्या आरोपाखाली त्यांनी ही अटक केली आहे. 

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, "लॉकडाऊन सुरू होण्याआधी दीड महिना स्पामध्ये काम केलं होतं. मात्र 22 मार्च रोजी नोकरी सोडली होती. त्यानंतर 11 जून रोजी मालकीण रजनी यांच्याकडे थकीत पगारासंबंधी विचारणा केली. त्यावेळी तिने घरी बोलावलं. घरी पोहोचल्यानंतर पैसे हवे असतील तर घरकाम करण्यास सांगितलं. नकार दिला असता रजनी यांनी धमकावलं आणि अंगावर कुत्रा सोडला."

मालकिणीने इशारा करताच कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाली. उपचारादरम्यान चेहरा आणि मानेवर असे एकूण 15 टाके लागले आहेत. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मालकिणीला याप्रकरणी अटक केली आहे. तसेच अधिक तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लॉकडाऊन दरम्यान अशा अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 1 कोटी लोकांनी केली चाचणी

...म्हणून उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं 'रामायण'

"राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत", 'त्या' आरोपांवर थेट कंपनीने दिलं प्रत्युत्तर

"मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल"

सावधान! 3 वर्षांनी पुन्हा आलाय 'हा' खतरनाक Android Virus; फक्त एक मेसेज अन्...

धक्कादायक! "माझी हत्या होऊ शकते", कोरोनाग्रस्त पत्रकाराच्या आत्महत्येनंतर 'ते' चॅट व्हायरल

Web Title: delhi spa employee bitten by pet dog whe demand salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.