धक्कादायक! Sulli Deals अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचा 'लिलाव'? FIR दाखल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 01:27 PM2021-07-13T13:27:11+5:302021-07-13T13:29:22+5:30

'सुल्‍ली' एक टर्म आहे, ज्याचा वापर काही लोक मुस्लीम महिलांसाठी करतात. 'सुल्‍ली डील्‍स' गिटहबवरील एक अ‍ॅप आहे.

Delhi Sulli deals app attack on muslim women police registers fir arrest ritesh jha trends on twitter | धक्कादायक! Sulli Deals अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचा 'लिलाव'? FIR दाखल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

धक्कादायक! Sulli Deals अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचा 'लिलाव'? FIR दाखल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

googlenewsNext

नवी दिल्‍ली - एका अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचे फोटो अपलोड करून त्यांचा लिलाव करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. 'Sulli Deals' अ‍ॅपच्या माध्यमाने 80 हून अधिक महिलांची 'बोली' लावण्यात आली आहे. काही पीडित तरुणींनी यासंदर्भात दिल्‍ली पोलिसांत तक्रार दाखल केली, यानंतर सायबर सेलने एफआयआर दाखल केली आहे. यासंपूर्ण प्रकरणावरून ट्विटरवरही मोठा गोंधळ उडाला आहे. 'रितेश झा' नावाच्या व्यक्ती भोवती मंगळवारी ट्रेंड्स फिरत होते. या व्यक्तीचे नाव यापूर्वीही ऑनलाइन लैंगिक गुन्ह्यांमध्ये समोर आले आहे. (Delhi Sulli deals app attack on muslim women police registers fir arrest ritesh jha trends on twitter)

काय आहे सुल्‍ली डील्‍स?
'सुल्‍ली' एक टर्म आहे, ज्याचा वापर काही लोक मुस्लीममहिलांसाठी करतात. 'सुल्‍ली डील्‍स' गिटहबवरील एक अ‍ॅप आहे. ते ओपन केल्यानंतर यूझर्सना मेसेज दिसेल, ‘Find your Sulli Deal of the Day’. पुढे गेल्यानंतर आपल्याला रँडमली कुण्या मुस्लीम महिलेचा फोटो दिसेल. जी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरून घेतलेली असेल. खरे तर, याच्याशी संबंधित लोकांनी ट्विटरवरवर 'डील ऑफ द डे' म्हणून फोटो शेअर करायला सुरुवात केल्यानंतर, या अ‍ॅपची चर्चा सुरू झाली. आता हे अ‍ॅप GitHub ने हटवले आहे.

कुठलीही परवानगी न घेता अपलोड करण्यात आले महिलांचे फोटो -
'सुल्ली फॉर सेल' नावाने एक ओपन सोर्स अ‍ॅप तयार करण्यात आले. यात महिलांच्या ट्विटर हँडलवरून माहिती आणि पर्सनल फोटोज चोरी करून टाकण्यात आले. यानंतर यांचा सार्वजनिकरित्या लिलाव करण्यात आला. यालाच 'सुल्‍ली डील्‍स' म्हटले गेले. हे अ‍ॅप लोकांना, 'फाइंड युअर सुल्ली डील ऑफ द डे', असे नोटिफिकेशन पाठवत होते. या अ‍ॅपवर शेकडो महिलांचे फोटो त्यांची परवानगी न घेता अपलोड करण्यात आले आहेत. यासंदर्भात तक्रार येताच, GitHub ने अ‍ॅप तयार करणाऱ्या यूझरला सस्‍पेंड केले आहे. 

कोण आहे रितेश झा? होतेय अटक करण्याची मागणी -
यापूर्वी, रितेश झाचे नाव गेल्या वर्षी चर्चेत आले होते. तेव्हा काही कॉल रिकॉर्डिंग्‍स लीक झाल्या होत्या. यात त्याने कथितपणे मान्य केले होते, की त्याने घरात काम करणाऱ्या मुस्लीम महिलेचे लैंगिक शोषण केले आणि त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर टाकला. यूट्यूबवर Liberal Doge नावाच्या चॅनलवर मुस्लीम महिलांचे ईदचे फोटो सेक्‍सुअलाइज करण्यात आले आले. यातही रितेशचे नाव आले होते. 

 

Web Title: Delhi Sulli deals app attack on muslim women police registers fir arrest ritesh jha trends on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.