...म्हणून दिल्लीतील व्यापाऱ्यांनी फोडले भाजीफटाके!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 09:00 AM2018-11-08T09:00:38+5:302018-11-08T09:22:19+5:30
दिल्लीमध्ये ‘ग्रीन’ फटाके विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी भाजीफटाके घेऊन अनोख्या पद्धतीने विरोध केला आहे.
नवी दिल्ली - दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतानाच यंदा सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर काही निर्बंध घातले आहेत. तसेच ग्रीन फटाक्यांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दिल्लीमध्ये ‘ग्रीन’ फटाके विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी भाजीफटाके घेऊन अनोख्या पद्धतीने याचा विरोध केला आहे.
Delhi: Sadar Bazar Welfare Association is staging a protest against the SC order on green crackers, by putting firecrackers inside green vegetables. President of the Association HS Chhabra says "We don't even know what green crackers are. There is no green cracker in the market." pic.twitter.com/xKso23wtUe
— ANI (@ANI) November 7, 2018
दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत ‘ग्रीन’ फटाके वाजवण्याची सक्ती केली आहे. मात्र दिल्लीमध्ये अशा प्रकारचे ‘ग्रीन’ फटाके कुठेही न मिळाल्याने व्यापाऱ्यांनी भाज्यांमध्ये फटाके बसवून ते वाजवले. व्यापाऱ्यांनी भेंडी, कारले, मिरची, मुळा, गाजर अशा काही भाज्यांमध्ये फटाके भरून ‘ग्रीन’ फटाके म्हणून ते फोडले.
We don't know what green crackers are. When we asked them (SHOs), they said they'll give us a list of crackers. But the next day they said it'll take 2 more days. There is no green cracker in the market. This should've been done 1 yr in advance: Sadar Bazar Welfare Assn President pic.twitter.com/qm3ZVNeTAL
— ANI (@ANI) November 7, 2018
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एच. एस. छाब्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ग्रीन’ फटाके कुठे मिळतात हे कुणालाच माहिती नाही असे सांगितले. आम्ही एसएचओ ग्रीन फटाके कुठे मिळतात याची यादी द्यावी अशी विनंती केली होती, मात्र त्यांनी याबाबत यादी दिली नाही'. बाजारात पर्यावरणपूरक फटाकेच नसतील तर ते आणणार कोठून असा सवालही छाब्रा यांनी केला आहे.