संतापजनक! लायसन्ससाठी अडवलं; चालकाने पोलिसालाच बोनेटवरून फरफटत नेलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 04:45 PM2024-01-29T16:45:44+5:302024-01-29T16:56:54+5:30

हेड कॉन्स्टेबलला एका कार चालकाने बोनेटवर सुमारे 800 मीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

delhi traffic police constable dragged on car bonnet for 800 metres by ertiga driver | संतापजनक! लायसन्ससाठी अडवलं; चालकाने पोलिसालाच बोनेटवरून फरफटत नेलं

संतापजनक! लायसन्ससाठी अडवलं; चालकाने पोलिसालाच बोनेटवरून फरफटत नेलं

दिल्ली कँट परिसरात हेड कॉन्स्टेबलला एका कार चालकाने बोनेटवर सुमारे 800 मीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉन्स्टेबलने कार चालकाकडे वाहनाची कागदपत्र मागितली होती. ही घटना शनिवारी सकाळी 10.15 च्या सुमारास घडली. दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बलवंत सिंह असं कॉन्स्टेबलचं नाव असून ते आयजीआयए ट्रॅफिक सर्कलमध्ये तैनात आहेत.

दिल्ली वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एएसआय हनुमान सहाय आणि हेड कॉन्स्टेबल बलवंत सिंह एअरपोर्ट हॉटेलजवळील IGIA टर्मिनल-1 येथे तपास करत होते. त्यांनी एर्टिगा कार (UP 16 JT 0656) च्या चालकाकडून ड्रायव्हिंग लायसन्स मागितले. तेव्हा चालकाने त्याचं लायसन्स जप्त केल्याचं सांगितलं आणि नंतर त्याने वेगाने कार ट्रॅफिक पोलीस उभे असलेल्या जागेवर नेली. त्यांच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी पुढे सांगितलं की, एएसआय हनुमान सहाय हे थोडक्यात बचावले, पण बळवंत कारच्या बोनेटवर पडले. चालकाने कार सुमारे 700-800 मीटर दूर नेली. टॅक्सी चालक आणि लोकांनी त्याला अडवलं. एएसआय हनुमान सहाय यांनी पीसीआरला फोन केला. स्थानिक पोलीसही तेथे पोहोचले आणि आरोपी चालक राशिद अलीला अटक करण्यात आली. त्याला दिल्ली कँट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. बलवंत सिंह यांना दुखापत झाली आहे. 

यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्येही अशीच घटना समोर आली होती. दिल्ली ट्रॅफिक पोलिसाने सीट बेल्ट न लावल्यामुळे कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली. धडकेनंतर पोलीस कर्मचारी गाडीच्या बोनेटवर पडला. ड्रायव्हरने गाडी 500 मीटर चालवली. त्यानंतर लोकांनी आरोपी कार चालकाला पकडलं होतं.
 

Web Title: delhi traffic police constable dragged on car bonnet for 800 metres by ertiga driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.