"गरिबांसाठी बेरोजगारी हे सर्वात मोठं संकट; कोरोना महामारीत 76% लोकांनी गमावल्या नोकऱ्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:35 PM2022-04-20T15:35:27+5:302022-04-20T15:42:18+5:30
Unemployment : दिल्लीतील झोपडपट्टी भागात लोकनीती-CSDS ने कोरोनाच्या काळात बेरोजगारीबाबत सर्वेक्षण केले, ज्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लाखो लोक बेरोजगार झाले आणि त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. दिल्लीतील झोपडपट्टी भागात लोकनीती-CSDS ने कोरोनाच्या काळात बेरोजगारीबाबत सर्वेक्षण केले, ज्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लोकनीती-CSDS सर्वेक्षणातील सहभागींपैकी 60% लोक कुठेना कुठेतरी नोकरी करतात असे आढळून आले. यापैकी 33% लोक कोणत्या ना कोणत्या नोकरीत गुंतलेले होते आणि 27% छोटा व्यवसाय चालवत आहेत. सुमारे 17% कोणत्याही कामात गुंतलेले नव्हते किंवा नोकरी शोधत होते. 19% महिलांनी त्या गृहिणी असल्याचं म्हटलं आहे तर 4% त्यांचे शिक्षण घेत आहेत. 41% स्त्रिया त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होत्या, त्यापैकी 22% नोकरदार होत्या आणि 19% महिलांनी छोटा व्यवसाय सुरू केला होता. पुरुष 77% पेक्षा जास्त नोकरदार होते ज्यापैकी 43% नोकरदार होते आणि 34% छोटा व्यवसाय चालवत होते.
सर्वेक्षणात भाग घेतलेल्या सुमारे 76% लोकांनी सांगितले की, त्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या नोकऱ्या गमावल्या, तर 24% लोकांनी इतर काही काम सुरू करण्यासाठी आपली नोकरी सोडली. सर्वेक्षणात 63% लोकांनी कोरोनाच्या काळात आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याकडून पैसे घ्यावे लागले असं म्हटलं आहे. सर्वेक्षण केलेल्या 15% लोकांनी नोंदवले की, महामारीच्या काळात त्यांना त्यांच्या गावी परत जावे लागले आणि 7% लोकांना त्यांची घरे रिकामी करावी लागली. रिकामी घरांची ही कमी संख्या असू शकते कारण सर्वेक्षण सहभागी दिल्लीतील नवीन स्थलांतरित नाहीत कारण त्यापैकी 29% दिल्लीतच जन्मलेले आणि वाढलेले आहेत
57% लोकांनी सांगितले की ते 10 वर्षांहून अधिक काळ दिल्लीत राहत आहेत. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की महामारी दरम्यान, 8% लोकांना आर्थिक मदत मिळाली होती आणि 4% लोकांना सरकारकडून नोकरीशी संबंधित मदत मिळाली होती. सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, दिल्लीत जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे मिळाले तर ते त्यांच्या गावात राहतील का? या प्रश्नाच्या उत्तरात, 42% म्हणाले की त्यांना त्यांच्या गावात किंवा शहरात स्थायिक व्हायला आवडेल तर 55% म्हणाले की ते दिल्लीत राहतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.