दिल्ली विद्यापीठ निवडणूक - एबीवीपीला झटका, काँग्रेसशी संबंधित NSUI ने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 02:34 PM2017-09-13T14:34:16+5:302017-09-13T14:34:16+5:30
दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा झटका बसला आहे.
नवी दिल्ली, दि. 13 - दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसशी संबंधित असलेल्या एनएसयूआयने या निवडणुकीत बाजी मारली आहे. अध्यक्षपदासह तीन जागांवर एनएसयूआयने विजय मिळवला आहे. अध्यक्षपदी एनएसयूआयच्या रॉकी तूशीदची निवड झाली आहे. एबीवीपीचे रजत चौधरी, एआयएसएचे पारुल चौहान, अपक्ष उमेदवार राजा चौधरी आणि अल्का अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते.
बुधवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात किंग्सवे कॅम्प येथील सभागृहात मतमोजणी सुरु झाली. दिल्ली विद्यापीठात मागच्यावर्षी जे निकाल लागले होते. बिलकुल त्याउलट निकाल यावर्षी लागले होते. मागच्यावर्षी एबीवीपीने तीन जागा तर, एनएसयूआयने संयुक्त सचिवपदाची एकमेव जागा जिंकली होती.
यावर्षी एबीवीपीला सचिवपदाची एकमेव जागा जिंकता आली आहे. मंगळवारी पार पडलेल्या दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत एकूण 43 टक्के मतदान झाले. या निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढे दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होतात. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असते.
#DUSUelection2017: NSUI wins President Post, ABVP wins Secretary post
— ANI (@ANI) September 13, 2017