Delhi Unlock: उद्यापासून 100% क्षमतेसह मेट्रो-बस धावणार, तर मॉल-सिनेमागृहात 50% नागरिकांना परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 04:59 PM2021-07-25T16:59:14+5:302021-07-25T17:13:28+5:30
Delhi Unlock: डीडीएमएच्या आदेशानंतर उद्यापासून(26जुलै) दिल्ली अनलॉक होणार आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये (Delhi)कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. यामुळे दिल्लीआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) च्या आदेशानंतर उद्या म्हणजेच 26 जुलै सकाळी 5 वाजेपासून सरकारने दिल्ली मेट्रो (Delhi Metro) आणि डीटीसी बस (DTC Buses) 100% क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच, सिनेमागृह, नाट्यगृह आणि मॉलमध्ये 50% नागरिकांना परवानगी असेल.
दिल्ली सरकारने मेट्रो आणि डीटीसी बसशिवाय सिनेमागृह आणि मल्टीप्लेक्ससह अनेक गोष्टी सुरू करण्याचा प्रस्ताव डीडीएमएला पाठवला होता. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर उद्यापासून डीडीएमएने अनलॉकची परवानगी दिली आहे. परंतु, यादरम्यान कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारने अद्याप शैक्षणिक संस्था सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही.
दिल्लीतील कोरोना परिस्थिती
दिल्लीत शनिवारी 66 नवीन रुग्ण सापडले, तर 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिल्लीत सध्या 587 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 14 लाख 10 हजार 216 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुःखद बाब म्हणजे, 25,041 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय.
दिल्लीत काय सुरू आहे काय बंद ?
> डीडीएमएकच्या आदेशानंतर सिनेमागृह, थियेटर, मल्टीप्लेक्सला 50 टक्के कॅपेसिटीसह सुरू करता येणार.
> 26 जुलैपासून सर्व ऑडिटोरियम आणि असेंबली हॉल 50 टक्के क्षमतेसह उघडले जातील.
> बँक्विट हॉल, मॅरिज हॉल किंवा हॉटेलमध्ये होणाऱ्या लग्नात 100 लोकांना येण्याची परवानगी.
> अंतिम संस्कारात 100 लोकांना परवानगी.
> शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद.
> सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी.
> धार्मिक स्थळे उघडण्यास बंदी.