Delhi Violence: हिंसेतील पीडितांच्या मदतीसाठी ऑन द स्पॉट देणार 25 हजार रुपये, केजरीवालांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 06:46 PM2020-02-28T18:46:00+5:302020-02-28T18:58:59+5:30
आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी हिंसाचारातील पीडितांना मदत जाहीर केली आहे.
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केलं जातं आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, आतापर्यंत 42 जणांना आंदोलनापायी जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी हिंसाचारातील पीडितांना मदत जाहीर केली आहे. हिंसेतील पीडितांना आम्ही मोठ्या प्रमाणात जेवण पोहोचवतो आहोत. ज्या लोकांची घरं आगी पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती केजरीवालांनी दिली आहे.
या हिंसक आंदोलनात ज्यांची घरं पूर्णतः नेस्तनाबूत झाली आहेत, त्यांना पैशांची नितांत गरज आहे. उद्या शनिवारी अशा लोकांसाठी 25-25 हजार रुपये ऑन द स्पॉट देणार असल्याचं केजरीवालांनी जाहीर केलं आहे. त्यांचे उर्वरित पैसे दोन ते तीन दिवसांत निरीक्षकाकडून खातरजमा केल्यानंतर वितरीत करण्यात येतील, असंही केजरीवालांनी स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपासून देशाची राजनाधी असलेल्या दिल्लीमधल्या उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरलेला आहे. त्यानंतर आता आंदोलकांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)च्या जवानाच्या घरांवर निशाणा साधला आहे. २५ फेब्रुवारीच्या दुपारी खजुरी भागातील एका जवानाच्या घरात तोडफोड अन् जाळपोळ करण्यात आली होती. CAA कायद्यावरुन दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली. या हिंसाचारात दगडफेक आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.Delhi CM: People whose houses are completely burnt down or substantially burnt down will be given on spot ex-gratia of Rs 25,000 cash each from tomorrow afternoon. Balance amount will be assessed within 2-3 days by PWD dept & we'll make an effort to get them their balance cheque. https://t.co/zR0kftRhVC
— ANI (@ANI) February 28, 2020
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
Delhi Violence : देशातून धर्मनिरपेक्षता, समाजवाद अन् लोकशाही संपुष्टात, मित्रपक्षाकडून भाजपाला घरचा आहेर
Delhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलं
Delhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
...म्हणून राणेंनी केले उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदन
पाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ